Nanded Accident : टेम्पो दरीत कोसळून तीन ठार

माहूरला दर्शनासाठी आलेल्‍या भाविकांवर काळाचा घाला
Nanded District Accident
Nanded District Accidentpudhari photo
Published on: 
Updated on: 

श्रीक्षेत्र माहूर : शारदीय नवरात्रोत्सवात श्रीरेणुका मातेचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो माहूर नजिक उखळी घाटात दरीत कोसळला, या भीषण अपघातात तिघे जण ठार झाले, तर तिघे जखमी झाले.सदरची दुर्दैवी घटना शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी पाचच्या सुमारास घडली.

यवतमाळ येथील एका फर्निचर दुकानात काम करणारे सहा कामगार श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी माहूरगडला आले होते. दर्शनानंतर यवतमाळकडे परत जातांना माहूर शहराच्या पश्चिमेस सुमारे दोन किमी अंतरावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयानजीक पहिल्या वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि एमएच २९ बीई ६८५९ क्रमांकाचा मॅक्सिमो जितो हा टेम्पो सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळला.

Nanded District Accident
Nanded News : रस्‍त्‍याचे काम सुरू तरीही सिमेंटचा लेप देऊन रस्‍त्‍याची दुरुस्ती कशासाठी?

त्यात यवतमाळ येथील बाबाराव ज्ञानोबा टेकाम (वय ६०), राहुल सुधाकरराव ठाकरे (वय २५) आणि प्रीतम रामराव प्रधान (वय ३८) हे तिघेही वाहन दरीत कोसळताना बाहेर फेकले गेले. दगडावर आदळल्याने तसेच अंगावर दगड आणि टेम्पो पडल्याने ठार झाले. तसेच केबिन मधील चालक प्रतीक अरविंद अडकीने (वय 26वर्षे ), दत्ता मनोहर मेश्राम (वय 35वर्षे ) व यशवंत अरविंद पाटील (वय २५ वर्षे ) हे जखमी झाले.

एका भाविकाने या अपघाताची माहिती ११२ क्रमांकावर दिल्यानंतर गस्तीवर असलेले पो. नि. देविदास चोपडे आणि पोलिस कर्मचारी पवन राऊत यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पो. नि. चोपडे यांनी पत्रकार इलियास बावाणी आणि गोपाल चव्हाण यांच्या मदतीने दरीतून मृतदेह व जखमींना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले.

दरम्‍यान, घटनास्‍थळी तातडीने क्रेन उपलब्ध करून दिल्याने दरीत कोसळलेला टेम्पो बाहेर काढण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बिपिन बाभळे यांनी उपचार सुरू असताना बाबाराव टेकाम यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

रुग्णालयातील वैद्यकीय व परिचारिका कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवा देत जखमींवर उपचार केले आणि मृतदेहांचे शवविच्छेदन केले. एस. बी. बोथिंगे, दत्ता पालटवाड, एस. कुंठेकर, आर. श्रीमंगले, पी. आर. जुडे, जी. आर. भोपाळे, अमृता कऱ्हाळे आणि गणेश धुळगंडे यांनी जखमीवर उपचार केला.

Nanded District Accident
Latur Crime : जुगार अड्ड्यावर धाड; ३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

पो. नि. देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सत्यपाल मडावी, पोलीस कर्मचारी संघरत्न सोनसळे, पवन राऊत तसेच होमगार्ड एस. पी. भगत आणि मुरकुटे यांनी पंचनामा केला. पुढील तपास सपोनि शरद घोडके हे करीत आहेत.उखळी घाटातील धोकादायक वळणावर संरक्षक कठडे, भिंत आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे किती गरजेची आहे, याची प्रचिती या दुर्दैवी घटनेने आली आहे.

कार नदीत कोसळली; पत्नी बेपत्ता, पती बचावला

कंधार : तालुक्यातील बहादरपुरा येथील मन्याड नदीवरील पुलावरून एक चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळून एक महिलेचा मृत्‍यू झाल्‍याची घटना १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. पार्वती लक्ष्मण गुट्टे (वय ४०, रा. सावरगाववाडी, ता. मुखेड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर या अपघातात त्यांचे पती लक्ष्मण गुट्टे (वय ५०) यांनी पोहून नदीतून बाहेर येत आपला जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच कंधार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नदीत कोसळलेली कार बाहेर काढली.

या पुलाची अवस्था धोकादायक असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ऑगस्ट २०२६ मध्ये पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पुलाचे कठडे तुटलेले असून काँक्रीटला तडे गेले आहेत, असे असतानाही पुलावरून वाहतूक सुरू कशी होती? असा सवाल आत उपस्थित केला जात आहे.

या दुर्घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप कंधार शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुलावरील वाहतूक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी, आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक सुरू ठेवण्यास कारणीभूत परिस्थितीची चौकशी करावी, अशी मागणीही आत या निमित्ताने केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news