Nanded News : डीजे प्रकरणात राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही!

शांतता समितीच्‍या बैठकीत अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची तंबी
Mahur DJ Controversy
Mahur DJ Controversypudhari photo
Published on: 
Updated on: 

श्रीक्षेत्र माहूर : आक्षेपार्ह गाणे वाजविणे आणि बॅनर फाडण्याच्या घटनांमुळे माहूर शहरातील सामाजिक वातावरण तापले असताना, यापुढे डीजे वाजविण्याच्या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट आणि कठोर भूमिका अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घेतली.

माहूर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी ही तंबी दिली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असताना, यापूर्वी १२ डीजे कर्णकर्कश आवाजात कसे वाजले, त्यांना परवानगी कुणी दिली आणि वेळीच कारवाई का झाली नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Mahur DJ Controversy
Parbhani Agriculture News : दुष्काळाच्‍या झळांतही ठिबकवर फुलविली गोदावरी तूर; कमी पाण्यात शेंगांचा बहर

माहूर शहरातून काढण्यात आलेल्या एका मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह गाणे वाजविण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करून माहूर बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी बॅनर फाडल्याची घटना घडली. परिणामी, बाजाराचा दिवस असूनही सोमवारी शहरात पुन्हा बंद पाळण्यात आला.

या दोन्ही घटनांप्रकरणी माहूर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.शहरातील या घटनांमुळे सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सोमवारी दुपारी एक वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Mahur DJ Controversy
Nanded Gutkha Seizure : नांदेडमध्ये गुटख्याचा मोठा साठा जप्त; ६८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, जोंधळे, भाजपचे युवानेते डॉ. निरंजन केशवे, नगरसेवक गोपू महामुने, मेघराज जाधव यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते.

बैठकीच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना अर्चना पाटील यांनी डीजेच्या वापराबाबत पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. कायद्याच्या चौकटीत राहूनच धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पाडावेत. डीजे वाजविण्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव अथवा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.