Mahayuti coordination committee : समन्वय समितीचा फार्म्युला नांदेडमध्ये यशस्वी होणार का?

जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय
Mahayuti
Mahayuti Pudhari
Published on
Updated on

नांदेड : आगामी निवडणुका एकत्र लढविण्यावर महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. परंतु नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षात निर्माण झालेला बेबनाव पाहता नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत हा फार्मूला यशस्वी होणार का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील भाजपा , राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने एकमेका विरुद्ध दंड थोपटले होते. श्रेष्ठींच्या आदेशानंतरही या तिन्ही घटक पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये एकत्र निवडणूक लढविण्यावर एकमत झाले नाही. परिणामी या तिन्ही घटक पक्षांनी एकमेकांविरुद्ध प्रचार केला. विशेष म्हणजे महायुतीतील प्रदेश पातळीवरील प्रमुख नेत्यांनीही ठिकठिकाणी परस्परविरोधी प्रचार सभाही गाजवल्या.

Mahayuti
Chhatrapati Sambhajinagar Crime : नशेची तलफ भागवण्यासाठी दुचाकी चोरी ; सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळाले परंतु महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला जबर धक्का बसला. या दोन्ही पक्षांचा दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेनेला भाजपा पुढे नांगी टाकत महापालिकेत बिनशार्त पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवली. राष्ट्रवादीने मात्र "एकला चलो रे'ची भूमिका कायम ठेवली.

Mahayuti
Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १ सप्टेंबरला

घटक पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले मतभेद आणि मनभेद पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढतील याची शाश्वती सध्या तरी दिसत नाही. नुकत्याच झालेल्या नांदेड विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठ्या जड अंतकरणाने अमरनाथरांना पाठिंबा द्यावा लागला हे सर्वश्रुत आहे.

  • केवळ जिल्हा परिषद निवडणुकाच नव्हे तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही एकत्र लढविल्या जातील, सुमारे १७० महामंडळांवरील ६५० हून अधिक सदस्यांच्या नियुक्त्या महिनाभरात पूर्ण करण्याचे ठरले. विकासकामांसाठी निधीच्या समन्वयासह महायुतीतील घटकपक्षांमध्ये अधिक ताळमेळ वाढवण्यावरही या बैठकीतून भर देण्यात आला. परंतु नांदेड मधील सध्याची राजकीय स्थिती, समन्वयाचा अभाव, प्रचंड मतभेद यामुळे समन्वय समितीचे निर्णय किती खरे ठरतील हे पहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news