Nanded Rain : मुखेड तालुक्यात जीवघेणा जलप्रलय, हसनाळ येथील ५ व्यक्ती बेपत्ता : मदत, शोधकार्य सुरू, अनेक घरांची पडझड

रविवार सोमवार दरम्यानची अतिवृष्टी आणि लेंडी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यानंतर मुखेड तालुक्यातील ९ गावे आणि परिसर जलमय झाल्याचे दृश्य
Nanded Rain
Nanded Rain : मुखेड तालुक्यात जीवघेणा जलप्रलय, हसनाळ येथील ५ व्यक्ती बेपत्ता : मदत, शोधकार्य सुरू, अनेक घरांची पडझड File Photo
Published on
Updated on

Life-threatening floods in Mukhed taluka, 5 people from Hasnal missing

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : रविवार सोमवार दरम्यानची अतिवृष्टी आणि लेंडी नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यानंतर मुखेड तालुक्यातील ९ गावे आणि परिसर जलमय झाल्याचे दृश्य सोमवारी दिवसभर बघायला मिळाले. मुक्रमाबाद परिसरात तर जीवघेण्या जलप्रलयाने अनेक संसार उद्ध्वस्त केले. या जलप्रलयात हसनाळ येथील ५ व्यक्ती बेपत्ता झाल्या. याच भागात रस्त्यावरच्या पुलावरून एक मोटार पाण्यात वाहून गेली. शेकडो जनावरांचे बळी घेणारी यंदाच्या पावसाळ्यातील सर्वांत मोठ्या आपत्तीची नोंद मघा नक्षत्राच्या चौथ्या दिवशी झाली.

Nanded Rain
Nanded Cloudburst | मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, पिकांचे नुकसान, जनजीवन विस्कळीत

मुखेड तालुक्यात १५ ऑगस्टपर्यंत जेमतेम पावसाची नोंद झाली होती. रविवारी दिवसभर संपूर्ण तालुक्यातील स्थिती सामान्य होती; पण रात्री या तालुक्याच्या मुक्रमाबाद महसूल मंडळात काही तासांतच २०० मि.मी. हून अधिक पावसाची नोंद झाल्यामुळे लेंडी धरणाख्या बुडीत क्षेत्रातल्या रावणगाव, वडगाव, हसनाळ, भिंगोली, भेंडेगाव आदी काही गावांसाठी रविचारची रात्र 'काळरात्र' ठरली. पावसाच्या भयंकर थैमानाचे वृत्त तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे आल्यानंतर राज्य आ पत्ती प्रतिसाद दलासह वेगवेगळ्या यंत्रणांकडून सकाळीच मदत व बचावकार्य सुरु झाले. तातडीच्या मदत कार्यामुळे जीवितहानी टळली असली, तरी अनेक कुटुंबांनी आपले पशुधन गमविले, अनेक म्हशी आणि इतर जनावरे पाण्यात वाहून दगावले. मुखेड तालुक्यातल्या बालाजी शंकरमा खेकरे यांच्या गोठधातील ४० पैकी ३० म्हशी वाहून गेल्या.

नांदेडमधील या आपत्तीची मुख्यमंत्री व त्यांच्या कार्यालयाने तातडीने नींद घेत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. सोमवारी सकाळपासून वेगवेगळ्या यंत्रणांकडून मदत, शोध आणि बचावकार्य सुरू झाल्यामुळे वेगवेगळ्या गावांमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले, मध्यरात्रीच्या काही घटना तर जीवघेण्या आणि धरकाप उडविणार्या होत्या, असे त्या भागात भेट देऊन आलेले खा. रवींद्र चव्हाण यांनी सायंकाळी 'दै. पुढारी'ला सांगितले.

Nanded Rain
Nanded Sahastrakund Project | सहस्त्रकुंड प्रकल्पावरून आमदार किसनराव वानखेडे यांना मतखंडातील गावकऱ्यांनी धरले धारेवर

जलसंपदा विभागाने लेडी धरणावरील मळभरणीचे काम सुरू करण्याची घाई केली नसती, तर बुडीत क्षेत्रातील गावांवर आज उद्भवलेले संकट टळले असते, असे नमूद करून हसनाळ येथे किमान ५ जग दगावल्याची भीती चव्हाण यांनी व्यक्त केली, लेंडी प्रकल्पाशी संबंधित कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके आणि त्यांच्या यंत्रणेवर लोकांचा रोष दिसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लेंडी नदीच्या पुरात बाधित होणार्यासाठी प्रशासनाने तात्पुरत्या निवार्यांची सोय करून ठेवली आहे. पण तेथे प्राथमिक सुविधाही नसल्याची तक्रार खासदारांनी नोंदविली.

हसनाळ, माटापूर, दोन्ही भेडेगाव, रावणगाव, भिंगोली आदी गावांमध्ये हाहाकार उडाला. प्रशासनाची मदत पोहचण्यापूर्वीच काँग्रेस तालुकाध्यक्ष राजीव रावणगावकर यांनी रावणगावमधील २५० जणांची आपल्याकडील सुरक्षितस्थळी व्यवस्था केली. राजणगाव येथे अडकून पडलेल्या ८ जणांना शासकीय यंत्रणेने सुखरूप बाहेर काढले. गावातल्या मशिदीवर १६ जण अडकले होते. अन्य गावांमध्येही अनेक नागरिक जेगवेगळ्या ठिकाणी अडकले होते. त्यांना सायंकाळपर्यंत सुरक्षितस्थळी आणण्यात आले.

मुखेड तालुक्यातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य आ पत्ती प्रतिसाद दल, शीघ्र प्रतिसाद दल, महसूल, पोलिस आणि अग्रिशमन विभागाची यंत्रणा, शोध व बचाव कार्यात उतरली आहे. या यंत्रणांच्या मदतीला छ. संभाजीनगर येथून लष्करी मदत पथकाला पाचारण करण्यात आले आहे. शेजारच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आलेल्या पाण्याचा मुखेड तालुक्याला फटका बसल्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासन लातूर आणि बिंदरच्या प्रशासनाशी समन्वय राखून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news