Leopard attack : भोकर येथे दुचाकीस्वार तरुणावर बिबट्याची झेप

ओढ्यात दडी धरून बसलेल्या बिबट्याने येथून, जवळच राहत असलेल्या प्रकाश विधाटे या तरूणावर जीवघेणा हल्ला केला,
Leopard attack
Leopard attack : भोकर येथे दुचाकीस्वार तरुणावर बिबट्याची झेपfile photo
Published on
Updated on

Leopard attacks young man riding a bike in Bhokar

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : ओढ्यात दडी धरून बसलेल्या बिबट्याने येथून, जवळच राहत असलेल्या प्रकाश विधाटे या तरूणावर जीवघेणा हल्ला केला, मात्र 'जीवावर बेतलेले संकट स्कूटरच्या शिटावर निभावले.' तालुक्यातील भोकर शिवारातील माणिकदेव रोडवर ही घटना घडली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत बिबट्याचा हा दुसरा थरार तर, पंचक्रोशीतील सलग तिसरा हल्ला घडल्याने दहशत पसरली आहे.

Leopard attack
Jalna Crime : सोन्याचे आमिष दाखवून जबरी चोरी; दोन आरोपी अटकेत

भोकर शिवारातील भोकर-मुठेवाडगाव व भोकर-खानापूर रोडला जोडणारा माणिकदेव या जोडरस्त्यावर दोन दिवसांपूर्वी शनिवार (दि.१९ सप्टेबर) च्या रात्री साडेआठ वाजता येथे आलेल्या शेवगाव व अहिल्यानगर येथील पाहुण्यांवर झडप घालून बिबट्याने दोघांना जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच रविवार (दि. २० सप्टेबर) सकाळी भामाठाण येथील मायलेकावर हल्ला चढवून माय-लेकाला बिबट्याने जखमी केले.

या पाठोपाठ (सोमवार दि.२१ सप्टेबर) रात्री साडेनऊवाजेच्या सुमारास फुल व्यावसायिक प्रकाश बापूसाहेब विधाटे (वय २८) हा तरुण नेहमीप्रमाणे श्रीरामपूर येथून व्यवसाय आटोपून दुचाकीवरुन घराकडे परतत होता ओढ्यालगत बिबट्या असल्याचे प्रकाश यांचे लक्षात येताच त्याने दुचाकी वळविण्याच प्रयत्न केला, मात्र ओढ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट प्रकाशवर झडप् घातली.

बिबट्याने स्कुटीच्या शिटवर पंज मारला. प्रकाश याने वाहन सावरत अक्षरश जीव मुठीत धरुन, पळ काढला. त्याची ओरड ओरड ऐकून कुटूंबियांसह भारत विधाटे किशोर विधाटे, राजेंद्र विधाटे, हनुमान पांढने यांच्यासह अनेकजण त्याच्या मदतीला धावले परंतू बिबट्या येथून पसार झाला.

Leopard attack
Arjun Khotkar : जरांगे, मिशा आम्हालाही आहेत !

मादी बिबट्यासह बछड्यांचा संचार

या परिसरात बिबट्याचा हा दोन दिवसात दुसरा जीवघेणा हल्ला घडल्यामुळे परिसरात बिबट्याची मादी असावी. जवळ तिचे बछडे असावेत. मादी परिसरातून कुणी जाताना दिसताच हल्ला चढवते, अशी शंका उपस्थित होत आहे. याप्रकाराचा वन विभागाने त्वरीत शोध घेवून, परिसर भयमुक्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news