

Leaf curl Worm infestation on tur crop
तामसा, पुढारी वृत्तसेवा : गत काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी शासनाकडे मदतीच्या प्रतिक्षेत आहे. तर दुसरीकडे अवकाळी ढग कायम असल्याने चिंता वाढत आहे. ढगाळ वातावरणुळे तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणारी अळीच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आता तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर्षी अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना चांगलीच संकटात टाकले आहे. संकटाची मालिका कायम चालू असतानाच अवकाळी पावसाने हाती आलेली पिकेही वाया गेली आहेत. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने पिक शेतात सडून गेले. पिके हातून गेल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता थोड्या प्रमाणात तरी आर्थित आधार होईल, त्यासाठी शेतकऱ्यांची तुरीच्या पिकावर भिस्त होती. मात्र, गेल्या आठवड्यापासूनच सतत ढगाळी वातावरण राहत असल्यामुळे तुरही हातून जाते की काय? या चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत.