Mahur Renuka Devi : श्रीरेणुकादेवी संस्थानला दानपेटीतून ४० लक्ष रुपयांचे दान

१८७ ग्रॅम सोन्यासह चार किलो चांदीचाही समावेश
Mahur Renuka Devi
Mahur Renuka Devi : श्रीरेणुकादेवी संस्थानला दानपेटीतून ४० लक्ष रुपयांचे दानFile Photo
Published on
Updated on

Donation of Rs 40 lakh from donation box to Sri Renuka Devi Sansthan

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सव व दीपावलीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठापैकी एकपीठ असलेल्या श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी ४० लाख ७४ हजार ६०९ रोख रक्कम आणि १८७ग्राम सोने व दोन किलो चांदीच्या वस्तू दानपेटीत दान केल्या, याशिवाय मंदिर परिसरातील सात दानपेटीतून २५ लक्ष ३७ हजार ४४० रुपयांचे संस्थानला दान मिळाले, अशी माहिती व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली आहे.

Mahur Renuka Devi
Nanded Farmer News : रोजगारासाठी अल्पभूधारक शेतकरी उसाच्या फडावर

श्री रेणुकादेवी संस्थानच्या मुख्य मंदिरात चार, तर मंदिर परिसरात सात दानपेटी आहेत. बुधवारी (दि.५) संस्थांनचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तूला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, दुर्गादास भोपी व व्यवस्थापक योगेश साबळे यांच्या उपस्थितीत श्रीरेणुका देवी मंदिरातील एकूण चार दानपेटी उघडण्यात आल्या.

त्या दानपेटीत भाविकांनी गुप्त दान केलेल्या ५००, २००, १००, ५०,२०,१० रूपयांच्या नोटा व पाच रुपयांचे नाणे असे एकूण ४० लाख ७४ हजार ६०९ रुपये तर १८७ ग्राम सोने व दोन किलो चांदीच्या वस्तूंचा दानामध्ये समावेश आहे. तसेच सुमारे चौदा महिन्यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, श्री भगवान परशुराम मंदिर व मंदिर परिसरातील एकूण सात दान पेट्या उघडल्या, त्यात २५ लक्ष ३७ हजार ४४० रुपये दान प्राप्त झाले आहे. मुख्य मंदिरातील चार व मंदिर परिसरातील सात असे एकूण अकरा दानपेटीतून एकत्रितरित्या ६६ लक्ष १२ हजार ४९ रुपये इतके दान प्राप्त झाले.

Mahur Renuka Devi
Nanded Fire News | ईस्लापूर येथे गांजा ओढताना शाळेला आग? डेक्स जळून लाखांचे नुकसान

१६ दिवसांतील इतर देणगी

दि. २२ ऑक्टो ते ६ नोव्हेंबर या कालावधीत संस्थांनच्या कार्यालयातील देणगी विभागात रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, धनादेश याद्वारे एकत्रित ६० लक्ष ९६ हजार ९०८ रुपये उत्पन्न मिळाले असून पातळ विक्रीतून १७ लक्ष २४ हजार ९४० रुपये उत्पन्न मिळाले आहे. संस्थांनच्या देणगी विभागात ३६ ग्रॅम ६७९ मिली सोन्याची दागिने व एक किलो पाचशे सहासष्ट ग्रॅम पाचशे वीस मिली चांदीचे दागिने दानातून प्राप्त झाले आहेत.

योगेश साबळे, व्यवस्थापक श्री रेणुकादेवी संस्थान माहुर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news