Crime News : एलसीबीची कारवाई; सहा पिस्टलसह ९ खंजर जप्त

नांदेड शहरासह परिसरात बेकायदेशीररीत्या अनिशस्त्रे व घातक हत्यारे बाळगणाऱ्या आणि त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे.
Nanded Crime News
Crime News : एलसीबीची कारवाई; सहा पिस्टलसह ९ खंजर जप्तfile photo
Published on
Updated on

LCB action; 9 daggers and 6 pistols seized

नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड शहरासह परिसरात बेकायदेशीररीत्या अनिशस्त्रे व घातक हत्यारे बाळगणाऱ्या आणि त्यांची खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ६ गावठी पिस्तूल, १३ जिवंत काडतुसे, ९ खंजिर आणि दोन मोटारसायकल असा एकूण ३ लाख १० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nanded Crime News
Nanded News : खा. गोपछडे सर्वत्र हजर; खा. चव्हाण गैरहजर !

दि. १३ ऑगस्ट रोजी पोउपनि महेश कोरे यांच्या पथकाला तीन इसम काळ्या रंगाच्या स्प्लेंडरवरून (MH-26-DA-4169) अवैध पिस्तूल घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने वाघी शिवारात नाळेश्वर ते सुगाव रस्त्यावर सापळा रचून आनंद उर्फ चिन्द्र सरदार यादव (वय २६, रा. वजीराबाद) व शेख जावेद उर्फ लड्या रेहमत शेख (वय २२, रा. विष्णुपुरी) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल व १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही शस्त्रे मध्यप्रदेशातील खंडवा येथून विक्रीसाठी आणल्याचे तपासात उघड झाले. त्यांचा तिसरा साथीदार शेख सोहेल उर्फ छोटा गुर्जर (रा. वजीराबाद) पसार झाला असून लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded Crime News
Mangalsutra Thief : मंगळसूत्र चोरासह तिघे जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

दुसऱ्या कारवाईत दि. १४ ऑगस्ट रोजी पोउपनि साईनाथ पुयड यांच्या पथकाने नवीन मोंढा परिसरात गस्त घालताना संशयितरीत्या फिरणाऱ्या अदित्य ऊर्फ मालको सुनील शर्मा (वय १९) व विवेक ऊर्फ विक्की नरहरी सूर्यवंशी (वय २४, दोघे रा. नांदेड) यांना ताब्यात घेतले. अदित्य याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे १ गावठी पिस्तूल आणि मॅगझिन जप्त करण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या कारवाईत एलसीबीच्या पथकाने अभिजित कैलास पवार रा. असदवन, नांदेड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३० हजार रुपये किंमतीचे एक पिस्टल जप्त केली. त्याच्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर चौथ्या कारवाईत पोउपनि नागनाथ तुकडे यांच्या पथकाने हिंगोली गेट फाटक ग्राउंड येथे आकाश शंकर पालिमकर (वय २४) व रोहित आनंदा सावते (वय २३) यांना २ खंजिरांसह ताब्यात घेतले.

त्यांनी हे खंजिर गुरुद्वारा जवळील एका दुकानातून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी गुरुमतीसिंघ खेमसिंघ बंगई (वय ५८) यांच्या दुकानाची झडती घेतली असता तेथे आणखी ७ खंजिर आढळले. पोलिसांनी एकूण ९ खंजिर व मोटारसायकल असा ८९,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले.

तीन पथकाची दमदार कामगिरी

ही सर्व धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली., पथक १ (पोउपनि महेश कोरे व अंमलदार, पथक २ पोउपनि साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार संतोष बेल्लुरोड, इम्रान शेख व पथक ३ (खंजिर जप्ती): पोउपनि नागनाथ तुकडे, पोलीस अंमलदार मोहन हाके, मिलिंद नरबाग, ब्रह्मानंद लामतुरे, आबाराव पिंगलवाड, लहु चाटे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news