

MP Gopchade present everywhere; MP Chavan absent!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणाच्या मुख्य सोहळ्यास उपस्थिती लावल्यानंतर भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांनी पाठदुखीच्या कारणावरुन नंतरच्या सर्वच कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या निमित्ताने खा. गोपछडे हजर आणि खा. चव्हाण गैरहजर असे चित्र दिसले.
१५ ऑगस्टच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजर राहण्यासाठी सावे शुक्रवारी रात्रौ उशिरा नांदेडमध्ये दाखल झाले. त्या दिवशी खा. चव्हाण व त्यांच्या आमदार कन्या तिरंगा रॅली निमित्त छ. संभाजीनगरात होते; पण नंतर सावे आणि चव्हाण स्वतंत्रपणे नांदेडला दाखलझाले. वरील रॅलीमध्येही चव्हाण यांची दमछाक झाल्याचे नदिडहून तेथे गेलेल्या कार्यकर्त्यांना जाणवले.
शनिवारी सकाळपासूनच सावे यांचे कार्यक्रम सुरु झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना या प्रसंगी आजी-माजी लोकप्रतिनिधींसह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमास खा. चव्हाणही उपस्थित असल्याचे दिसले; पण त्यानंतर पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वेगवेगळे कार्यक्रम संपन्न होत असतांना चव्हाण व त्यांच्या कन्येची उपस्थिती दिसली नाही.
आदल्या दिवशी रेली व प्रवासामुळे दगदग झाल्यामुळे चव्हाण यांना पाठदुखीचा त्रास होत होता, त्यामुळे ते इतर कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत असे स्पष्टीकरण भाजपच्या एका पुजारी पदाधिकान्याने दिले. सोहळा लक्षवेधी संपल्यानंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत काही शासकीय उपक्रम पार पडले. जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीच्या बैठकीसह भूमी अभिलेख विभागास लॅपटॉप वितरण, कर्जमुक्ती योजनेतील काही लाभार्थ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्राचे वाटप इत्यादी सर्व प्रसंगात दुसरे खासदार डॉ, अजित गोपछडे यांची उपस्थिती व सहभाग ठळकपणे दिसत असताना चव्हाण यांना तेथे हजर राहता आले नाही, असे सांगण्यात आले.
पालकंत्र्यांच्या मागील महिन्यातल्या दौन्यामध्ये खा. अशोक चव्हाण यांनी विश्रामगृहावर येऊन सावे यांची भेट घेतली होती. शनिवारच्या दौऱ्यातील वेगवेगळे कार्यक्रम झाल्यानंतर सावे दुपारपासून सायंकाळ पर्यंत शासकीय विश्रागृहावर होते. नांदेड-वाघाळा मनपा तसेच जिल्ह्यातील काही नगर पालिकांच्या निधीच्या विषयांत खा. चव्हाण यांनी सावे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले; पण या भेटीतून नेमके काय निष्पन्न झाले, ते कळाले नाही.
शनिवारी सकाळी खा. चव्हाण यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त समाजमाध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेन्द्र फडणवीस यांच्या कर्तबगारीचा त्यांनी खास उल्लेख केला. नांदेडमधील वेगवेगळ्या कार्यक्रमास गैरहजर राहिलेले चव्हाण व त्यांचे काही सहकारी नंतर मालेगाव व तेथून वसमतला गेल्याचे दिसून आले.
जि.प.चे माजी अध्यक्ष माणिकराव इंगोले यांचे गेल्या आठवड्यात दीर्घ आजाराने निधन झाले होते. खा. चव्हाण यांनी मालेगावला जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. नंतर वसमत येथील आतिश जयप्रकाश दांडगावकर यांनी सुरू केलेल्या भाजपा कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यालाही चव्हाण हजर होते-