

हिमायतनगर :- लातुर जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हुशार मातंग समाजाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला नसुन,तो घातपात आहे विद्यालयातील पलंगाला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आहे.अभ्यासाचा ताण की घातपात प्रशासनाने अद्याप स्पष्ट लेखी उत्तर दिलेले नाही.कुमारी अनुष्काचा घात झाला असल्याचा आरोप आई वडील आणि सामाजिक संघटनांनी केला आहे.
नवोदय विद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरा चेक करुन संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करुन त्यांच्यावर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
हिमायतनगर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लातुर जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या हुशार मातंग समाजाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला नसुन, तो घातपात आहे . याबाबत एसआयटी चौकशी समिती नेमण्यात यावी आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा अन्यथा मातंग समाज कायदा हातात घेतल्या शिवाय शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ हिमायतनगर नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर दि.12 जानेवारी बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लहुजी शक्ती सेना तालुकाध्यक्ष राजुभाऊ गायकवाड व लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा कार्याध्यक्ष धोंडोपंत बनसोडे, मारोती गाडेकर यादव येणेकर,माधव कांबळे प्रशांत राहुलवाड, निलेश चटणे यांच्या सह अनेकांनी स्वाक्षरीने निवेदन दिले आहे.