Nanded crime | किनवटमध्ये तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

एकूण ४ लाख २३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
 Gambling
GamblingPudhari
Published on
Updated on

किनवट : किनवट पोलिसांनी दत्तनगर, गोकुंदा परिसरात सुरू असलेल्या कथित तिर्रट जुगार अड्ड्यावर कारवाई करत नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी वाहने व जुगार साहित्य असा एकूण ४ लाख २३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.३५ वाजता दत्तनगर येथील एका टिनशेडमध्ये काही जण आर्थिक फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळत व चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईदरम्यान तेथे उपस्थित नऊ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

 Gambling
Kabnur gambling raid | कबनूर येथे जुगार अड्ड्यावर छापा; आठजण ताब्यात

या छाप्यात ६४ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम, अंदाजे ७४ हजार रुपयांचे नऊ मोबाईल फोन, २ लाख ८५ हजार रुपयांची सहा दुचाकी वाहने तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे ५२ पत्ते जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४ लाख २३ हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 Gambling
कवठेगुलंद येथे जुगार अड्ड्यावर छापा; साखर कारखान्यातील कामगारांसह 5 जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस हवालदार गजानन मल्लिकार्जुन वेरुळकर यांच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री १०.३९ वाजता किनवट पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पीएसओ सतीश लखुळे यांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नारायण मेंडके पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news