कवठेगुलंद येथे जुगार अड्ड्यावर छापा; साखर कारखान्यातील कामगारांसह 5 जणांवर गुन्हा दाखल

2 लाख,62 हजाराचा मुद्देमाल जप्त; रोख रक्कम, पत्ते व चार मोटरसायकली जप्त
Illegal Matka-Gambling
Illegal Matka-Gambling
Published on
Updated on

कुरुंदवाड : कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील केटगाळे मळा परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर कुरुंदवाड पोलिसांनी छापा टाकत साखर कारखान्यातील कामगारांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, पत्त्यांचा संच व चार मोटरसायकली असा एकूण २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Illegal Matka-Gambling
Beed Crime News | अंबाजोगाईत हॉटेलवर पोलिसांचा छापा; 'तिर्रट' जुगाराचा डाव उधळला, ६ जणांना अटक

गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कवठेगुलंद ते शेडशाळ रोडलगत असलेल्या केटगाळे मळ्यात पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना गणेश चंद्रकांत केटगाळे (वय ४८), चंद्रकांत धनपाल जगताप (वय ४३), अजम कमाल मलंगफकीर (वय ६०), श्रीकांत अर्जुन महाडीक (वय ४२) व नितीन विनायक कांबळे (वय २६, सर्व रा. कवठेगुलंद, ता. शिरोळ) यांना पैसे लावून जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले.

Illegal Matka-Gambling
Beed Crime News | अंबाजोगाईत हॉटेलवर पोलिसांचा छापा; 'तिर्रट' जुगाराचा डाव उधळला, ६ जणांना अटक

संबंधितांपैकी काहीजण साखर कारखान्यातील कामगार असल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे. छाप्यात साडेसात हजार रुपये रोख रक्कम, चार मोटरसायकली असा 2 लाख, 62 हजार, 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news