

हिमायतनगर : चिचोर्डी आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिरोना गट ग्रामपंचायत असलेल्या गणेशवाडी व गणेशवाडी तांडा गावाला गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संसर्ग आजाराने घेरले असल्याने गणेशवाडी तांड्यातील नागरीकांना जास्त लागन झाली असुन जिरोना गावांमध्ये तिन डेंग्यू रूग्ण आढळून आले आहेत. ताप, अंगदुखी, खाज, सांधेदुखी यासह अन्य आजाराने त्रस्त असुन यातील काही रूग्णांचे बल्डचे नमुने आरोग्य विभागाने घेतले असुन वैद्यकीय तपासणी करीता पाठवले आहेत. नागरीकासह अबालवृद्ध तापाच्या साथीसह अन्य आजाराने त्रस्त असल्यामुळे येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन वैद्यकीय यंत्रणा कामाला लागली असुन तिनही गावात आरोग्य टीम ठान मांडून आहेत. सदरील गावांना जिल्हा आरोग्य अधिकारी देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी धम्मपाल मुन्नेश्वर, वैद्यकीय अधिकारी देशमुख, यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून नागरीकांच्या आरोग्या बाबतीत सुचना आरोग्य विभागाच्या टीमला केल्या आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील जिरोना गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, येथील नागरीक तापीसह अन्य आजाराने त्रस्त असल्याची माहिती चिचोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला येथील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी कळविले होते. आरोग्य विभागाची टिमने या तिनही गावात भेटी देऊन नागरीकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले व ताप, अंगदुखी अगं खाजणे, सांधेदुखी ही आजार असलेल्या रूग्णांवर उपचार सुरू केले. त्यानंतर गावात धुर फवारणी केली डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे आजार वाढला असल्याचे सांगितले आहे. या गावांमध्ये दररोज 12 जनांची एक टीम अशा तिन गावात आरोग्य विभागाने टीम ठेवून येथील रूग्ण संख्या नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
पाण्यासह गावातील स्वच्छता ठेवावी नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वच्छ पाणी वापरावे, पाणी साठवून असते ती टाकी माठ दररोज स्वच्छ करावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जिरोंना, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा येथील डेंग्यू ताप इतर आजारांवर आरोग्य विभागाने तातडीने उपचार सुरू केले असल्याची माहिती सरपंच प्रतिनिधी बळवंत जाधव, ग्रामसेवक एस.व्ही.कासटवार, पोलिस पाटील गंगाधर मिराशे, यांनी दिली आहे.
हिमायतनगर तालुक्यात संसर्गजन्य आजाराची लागणं होण्याची शक्यता असुन ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्यापही थंड आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावपातळीवर आरोग्य सेवीका , आरोग्य सेवक, समुदाय यांनी आरोग्यासाठी जनजागृती करणं गरजेचं असुन अद्यापही एकाही गावात जनजागृती झाली नाही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गावोगावी भेटी देणं गरजेचं असुन त्यांचेही दुर्लक्ष केले आहे.आरोग्य सेवक आरोग्य सेविका, समुदाय अधिकारी यांनी आपल्या उपकेंद्राच्या ठिकाणी मुख्यालयी रहाणं गरजेचे असले तरी तालुक्याच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी प्रत्येकी उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावाला भेटी देणे व आरोग्य शिबीर घेऊन जनजागृती करणं गरजेचं असतांना अद्यापही भेट दिली नसल्याने आरोग्य यंत्रणा कागदावर सुरू असल्याचे चित्र आहे.
तालुका आरोग्य अधिकारी यांनी चिचोर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारे उपकेंद्र व सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारे उपकेंद्र व उपकेंद्रा अंतर्गत येणारी गावे या गावाला पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने भेटी देणं गरजेचं असतांना देखील सदरील अधिकारी भेटी न देता जिल्ह्यावरून अपडाउन करीत कारभार हाकत आहेत. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.
जिरोना गणेशवाडी गणेशवाडी तांडा गावातील नागरिकांना डेंग्यू सह तापी च्या आजराची लागन झाली असल्याची माहिती मिळताच आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी या गावांना भेटी देऊन आरोग्य अधिकाऱ्यांना नागरीकांच्या आरोग्यावर योग्य उपचार करून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या व तालुक्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेऊन आरोग्य यंत्रणा कामाला लावण्यासाठी देखील सुचना केल्या आहेत.