Gold-Silver Price : हातचे राखून सोन्याची विक्री करताहेत व्यापारी

दर घसरणीचा परिणाम : गुंतवणूकदारांना आणखी भाव उतरण्याची भीती
Gold and Silver Price Update
Gold and Silver Price UpdatePudhari
Published on
Updated on

In the gold and silver market, prices are falling rapidly

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सोन्या-चादींच्या बाजारात भावाची घसरण जोरात सुरू आहे. घसरणीमध्ये नुकसान वाचविण्यासाठी व्यापाऱ्यांनी हातचे राखून सोने विक्री सुरू केली. महाग दराने बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनी डिलिव्हरी घेण्यास नकार दिल्याने अडचणीत भर पडली आहे. अजूनही सोने व चांदीचे भाव घसरण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव दोन लाखांवर व चांदी तीन लाखांवर जाण्याच्या चर्चेने पैसे गुंतवणारे मात्र संकटात सापडले आहेत.

Gold and Silver Price Update
Ashokrao Chavan : अजित पवारांच्या अपघाताला राजकीय स्वरूप देऊ नका

गेल्या आठवडाभरापासून सोने चांदीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहे. यापूर्वी दर सातत्याने वाढत असताना व्यापाऱ्यांना त्याचा चांगला लाभ झाला होता. मात्र, आता सुरू अस-लेली घसरण चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे ग्राहक बाजारात फिरकेनासा झाला आहे. भाव उतरल्यावर सोने खरेदी वाढेल असा अंदाज असला तरी प्रत्यक्षात सामान्य ग्राहक स्थिर दराच्या पातळीची प्रतिक्षा करत आहेत. दुसरीकडे गुंतवणुकदारांनी सोने दोन लाखांवर प्रतितोळा जाणार या चर्चेवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ही सर्व गुंतवणूक आता अडकून पडली आहे. त्यामुळे तेही उतरलेल्या दरात खरेदीसाठी फारसे धजावत नसल्याचे चित्र आहे.

आंतरराष्ट्रीय अनिश्चितता हे दरवाढीचे मुख्य कारण होते. त्याप्रमाणे आता दर घसरणीचे कारण देखील या अनिश्चिततेच्या स्थितीतून निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे हललेले स्थान हे महत्त्वाचे कारण आहे. तसेच रशियाने त्यांच्या इंधनाचे व्यवहार रुबल चलनाद्वारे करण्याचा निर्णय घेतला, त्याचाही फटका बसला आहे. यातूनच ही घसरण सुरु झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Gold and Silver Price Update
पूर्वी नकार; पण २५ वर्षांनंतर 'नांदेड भूषण'साठी चव्हाणांचा होकार !

किलोने चांदी घेणारे नरम चांदीच्या दरातील झपाट्याने झालेली वाढ पाहून काही काळापूर्वी चांदीचे दर तीन लाख रुपयांच्या पुढे जाणार, अशी चर्चा होती. त्या अफवेवर विश्वास ठेवून अनेक गुंतवणूकदारांनी किलोच्या प्रमाणात चांदी खरेदी केली. मात्र, आता चांदीचे दर अडीच लाखांवरून दोन लाखांच्या आसपास आल्याने गुंतवणूकदारांना फटका बसला.

व्यवहारांची स्थिती

सर्वसाधारणपणे बाजारात दोन प्रकारचे व्यवहार होतात. एक जीएसटीसह बिलिंगचे व दुसरे रोख बिलिंगमध्ये रुपांतरीत केले जात होते. मात्र, आता रोखीने घेतलेले सोने दर उतरल्याने जवळ बाळगून भाव वाढीची प्रतीक्षा केली जात आहे. त्यामुळे सध्या बाजारावर भाववाढीचा परिणाम दिसून येत आहे. व्यवहार होतात. पूर्वी चढे दर होते तेव्हा रोखीने घेतलेले सोने सीएसटी बिलिंगमध्ये रुपांतरीत केले जात होते. मात्र, आता रोखीने घेतलेले सोने दर उतरल्याने जवळ बाळगून भाव वाढीची प्रतीक्षा केली जात आहे. त्यामुळे सध्या बाजारावर भाववाढीचा परिणाम दिसून येत आहे.

सोने व चांदीच्या दरात सातत्‍याने घसरण सुरू आहे. त्यामुळे पूर्वीची सोन्याची दोन लाख रुपये दर होण्याची अफवाच ठरली अजूनही दर घसरून एका स्थिर पातळीवर येतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. -
राधेश्याम मनियार, सराफा व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news