Nanded Accident News : पाखंडेवाडी पाटीजवळ भीषण अपघात; क्रुझर-हायवा धडकेत 2 ठार, 12 जखमी, 3 गंभीर

जांब–मुखेड मार्गावरील पाखंडेवाडी पाटीजवळ आज (दि. 27) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला.
Nanded Accident News
Accident News : पाखंडेवाडी पाटीजवळ भीषण अपघात; क्रुझर-हायवा धडकेत 2 ठार, 12 जखमी, 3 गंभीरFile Photo
Published on
Updated on

Horrific Accident Near Pakhandewadi Signboard; 2 Dead, 12 Injured (3 Critically) in Cruiser-Hyva Collision

मुखेड : पुढारी वृत्तसेवा

जांब–मुखेड मार्गावरील पाखंडेवाडी पाटीजवळ आज (दि. 27) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात झाला. नानीज धामहून भाविकांना घेऊन येणाऱ्या क्रुझरने रस्त्यावर उभ्या असलेल्या हायवा वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Nanded Accident News
Nanded Accident | हदगाव–तामसा मार्गावर कारची दुचाकीला धडक: चौघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, क्रुझर (क्र. MH-26-BC-0166) हे वाहन मुखेडकडे येत असताना पाखंडेवाडी पाटीजवळ उभ्या असलेल्या हायवा (क्र. MH-26-CH-2516) ला धडकले. धडक इतकी जोरदार होती की वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.

या अपघातात महेश वसंतराव पोतदार (वय 31, रा. मुखेड) आणि शंकर मारोती नखाते (वय 38, रा. खतगाव पडे) यांचा मृत्यू झाला. तर प्रसाद नरेश पोतदार (16), नरेश वसंत पोतदार (35) आणि ज्योती नरेश पोतदार (27) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर जखमींना मुखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nanded Accident News
Jalna Accident : भरधाव आयशरची उभ्या कारला पाठीमागून जोराची धडक; एकजण ठार

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news