Jalna Accident : भरधाव आयशरची उभ्या कारला पाठीमागून जोराची धडक; एकजण ठार

मंठा मार्गावरील सोलगव्हाण पाटीजवळ भीषण अपघात; दोन्ही वाहने चकनाचूर
Jalna Accident
जालनाः अपघातात नुकसानग्रस्त कार आणि पलटी झालेला आयशर.pudhari photo
Published on
Updated on

जालना ः जालना-मंठा रोडवरील सोलगव्हाण पाटीजवळ भरधाव आयशर कारवर पाठीमागून धडकून झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. हा अपघात गुरुवार (16)रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास झाला.

जालना मंठा रोडवरील सोलगव्हाण पाटीवर उभ्या कारला आयशर ने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाला. अपघातातील शंकर विठोबा सुर्यवंशी यांना सोलगव्हाण येथे दर्शनासाठी जायचे होते. विरेगाव येथे त्यांना जिंतूर वरून छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या कारने लिफ्ट दिली. त्यांना सोलगव्हाण कडे सोडत असताना पाठीमागुन वेगात आलेल्या आयशर ने कारला धडक दिली.

Jalna Accident
Vita Accident : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारला विट्याजवळ भीषण अपघात; ६ जखमी, दोघे गंभीर

यात शंकर सुर्यवंशी (50) (रा, दहेगाव, तालुका पुर्णा जि. परभणी) यांचा जागीच मृत्यू झाला.तर देविदास रामराव जोशी (55), रेणुकादास जोशी (75)(रा बोरी ता जिंतूर जिल्हा परभणी) हे जखमी झाले आहे. जखमींवर जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Jalna Accident
Kurundwad accident | तेरवाड–सलगर–सदलगा मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी

कारच्या पाठीमागील बाजु पुर्णपणे चेपल्याचे पहावयास मिळाले. अपघातानंतर आयशर रस्त्याच्या बाजुला उलटला. अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news