Cable Theft In Farms | कारला शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री 25 शेतकऱ्यांच्या मोटारींचे केबल चोरीला

Cable Theft In Farms | तांब्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर डल्ला; बोअर मोटारी निकामी
goa fire case
goa fire case
Published on
Updated on

हिमायतनगर

कारला शिवारात रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या शेतातील बोअर सिंचन विहीरीमधे असलेल्या मोटारीचे केबल कापून चोरट्यांनी नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली असून या घटनेमुळे शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.एकाच रात्री जवळपास वीस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीला गेला असुन पोलीसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

goa fire case
Gadchiroli Ganja Seizure | कोरची तालुक्यातून 15 लाखांचा गांजा जप्त, आरोपीस अटक

हिमायतनगर तालुक्यातील कारला शिवारात मंगळवारी मध्यरात्री शेतकऱ्यांच्या शेतातील बोअर व सिंचन विहीरीमध्ये असलेल्या मोटारीचे केबल चोरट्यांनी कापून पसार झाले असल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.

एकाच रात्री जवळपास विस ते पंचवीस शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीला गेले आहेत.गेल्या एका महिन्यांपासून हे चोरटे बोरगडी,सिबदरा शिवारात काही शेतकऱ्यांचे केबल चोरले होते.तदनंतर पुन्हा मंगळवारच्या रात्री देखील जवळपास पन्नास ते सत्तर फूट असलेला केबल कापून चोरटे पसार होत आहेत.मोटार स्टाटर फोडून केबल कापून घेऊन जाता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

goa fire case
Goa Cyber Crime News | वधू शोधण्याचा प्रयत्न ठरला महागात; 58 वर्षीय व्यक्तीला 1.41 कोटींचा गंडा

सध्या रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे शेतकरी गहू हरभरा ज्वारी पिकांना पाणी देत आहेत एकाच रात्री केबल तोडून नेले असल्याने मोटारी बंद पडल्या असुन लाखों रुपये किमतीचा केबल चोरीला गेला आहे.या केबल मध्ये तांबा असल्याने तांबा विकून चोरटे डल्ला मारत आहेत.

सदरील चोरट्यांचा हैदोस घातला असुन पोलिस प्रशासनाने गांभीर्याने चोरट्यांचा शोध घेतला पाहिजे तांबा कुठे विकल्या जातो याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.बुधवारी दुपारी कारला येथील शेतकऱ्यांनी पोलिस निरीक्षक अमोल भगत यांची भेट घेऊन तक्रार केली असुन चोरट्यांचा शोध लावाव अशी मागणी केली आहे.

ऐन पाणी देण्याची वेळ असताना शेतातील मोटार पंप बंद पडले असुन या घटनेमुळे शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पोलिस पाटील साईनाथ कोथळकर, तंटामुक्त अध्यक्ष डॉ गफार, जांबुवंत मिराशे, तुकाराम कदम, संजय मोरे, नंदकुमार मिराशे, सुभाष मोरे, बालाजी मिराशे,संभा ताटेवाड, अक्षय मोरे,गणपत यमजलवाड, शेषराव सुर्यवंशी यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news