Illegal gutkha transport raid : स्कॉपिॅओसह मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हा

तामसा पोलिसांनी कोपरा शिवारात केली धाडसी कारवाई
Illegal gutkha transport raid
स्कॉपिॅओसह मुद्देमाल जप्त; दोघांवर गुन्हाpudhari photo
Published on
Updated on

तामसा ः हदगाव तालूक्यातील तामसा पोलीसांनी अवैध गुटखा वहातूक करणाऱ्या विरूद्ध धाडसी कारवाई करत कोपरा शिवारात छापा टाकून जवळपास दीड लाख रुपयांचा गुटख्याचा साठा आणि पाच लाखांची स्कार्पिओ वाहन जप्त केले आहे.सदरील घटना सोमवार 9 फेब्रवारी सायंकाळी घडली. या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती तामसा पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून तामसा पोलिसांनी कोपरा शिवारातील एका आखाड्यावर ठेवलेला गुटखा, पान मसाला एका स्कार्पियोमध्ये असल्याची माहिती मिळाली.

Illegal gutkha transport raid
Nanded Crime : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक

दरम्यान तामसा पोलीस ठाण्याचे वाहन पाहताच गुटखा तस्कर पसार झाला. तसेच कोपरा शिवारात संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा साठ्यासह स्कार्पियो वाहन जप्त करून तामसा पोलीस ठाण्यात आणले.

Illegal gutkha transport raid
Girls safety concern : मुलींच्या छेडछाड प्रकरणी कडक कारवाईची मागणी

जवळपास दीड लाख रुपये किंमतीची विविध कंपन्यांचे अवैध गुटखा पान मसाला तसेच पाच रूपये किंमतीची स्कार्पियो गाड़ी तामसा पोलिसांनी जप्त केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सहदेव खेडकर व त्यांच्या सहकऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी गाडीमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास तामसा पोलीस हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news