

Good response from passengers to 'Vande Bharat'
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात सुरू झालेल्या नांदेड ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. सप्टेंबर महिन्यात प्रवाशांनी ७० टक्के प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत मुंबईला पोहोचणारी ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर व नाशिक येथे जाणऱ्या प्रवाश्यांसाठी सुद्धा सोयीची आहे.
देश विदेशात वंदे भारतचा डंका वाजू लागल्यानंतर नांदेड येथूनही ती सुरू व्हावी अशी नांदेडकरांची मागणी होती. दरम्यान जालना- मुंबई या मार्गावर ही रेल्वे अनायासे सुरू होणारच होती. तिचा नांदेड पर्यंत विस्तार करावा, असाही एक मतप्रवाह पुढे आला. त्यानुसार दि. २६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली आणि वंदे भारतचा नांदेड -मुंबई हा प्रवास सुरू झाला. त्याला एक महिना होऊन गेला आहे.
संपूर्ण सप्टेंबर महिन्यात सरासरी ७० टक्के प्रतिसाद या गाडीला मिळाला आहे. येत्या काळात तो निश्चित वाढेल कारण नाशिक येथे कुंभमेळ्याचे नियोजन आहे. त्यामुळे नांदेड व परिसरातील असंख्य भाविकांसाठी ही गाडी नाशिकला जाण्यासाठी अतिशय सोयीची आहे. नांदेड येथून सकाळी ५ वा. वंदे भारत मुंबईच्या दिशेने सुटते, सकाळी ८.३० वा. ती छत्रपती संभाजीनगर येथे पोहोंचते, येथील विभागीय आयुक्त तसेच उच्च न्यायालयाच्या कामासाठी जाणा-या प्रवाश्यांसाठी सुद्धा ती अतिशय सोयीची आहे.
मुंबई येथे ती दुपारी २ ते २.३० च्या सुमारास पोहोचते. नांदेड येथून सकाळी निघाल्यानंतर रेल्वेमध्ये नास्ता व जे-वणाची सुद्धा सोय आहे. संपूर्ण वातानुकूलित असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासाचा थकवाही जाणवत नाही. २ ३ तासामध्ये मुंबई येथील मंत्रालयातील कामकाज आटोपून रात्री मराठवाडा एक्सप्रेस किंवा राजार- ाणीने परतीचा प्रवास झोपून करता येऊ शकतो. प्रवाश्यातून या गाडीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया आहेत.