

Farmers are worried due to falling onion prices
शिऊर, पुढारी वृत्तसेवा : वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरातील शेतकरी सध्या कांद्याच्या घसरत्या दरामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जाते. मात्र उत्पादन खर्च प्रचंड वाढला असून, बाजारात मिळणारा भाव खर्च भागविण्यासाठीही पुरेसा नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
कृषी विभागाच्या आकडेव ारीनुसार, या वर्षी शिऊर परिसरातील ३५ गावात जवळपास साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. सध्या बाजारात कांद्याला फक्त ९०० ते १००० रुपये प्रति क्विटल एवढाच दर मिळत आहे. तर उत्पादन खर्च किमान १४ ते १५ रुपये प्रति किलो (म्हणजेच १,४०० ते १,५०० रुपये प्रति क्विंटल) इतका येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक क्विटल मागे ५०० ते ७०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी शासनाकडे योग्य हमीभाव जाहीर करण्याची मागणी करत आहेत. तसेच कांदा निर्यातीला चालना देण्यासाठी सबसिडी व प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे उदासीनतेने न पाहता तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, बाजारभाव वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, या संदर्भात कृषी विभागातील कृषी मंडळ अधिकारी शाम पाटील यांनी सांगितले की, कांदा लागवड टप्प्याटप्प्याने करा, कांदा चाळीत साठवा व टप्याटप्याने कांदा विक्री करा योग्य भाव मिळेल हा शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.