Nanded News : कामचुकार आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

त्रुटी व अनियमिततांची डॉ. विजय कंदेवाड यांनी घेतली गंभीर दखल
nanded news
Nanded News : कामचुकार आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवारfile photo
Published on: 
Updated on: 

Dr. Vijay Kandewad has taken serious note of the errors and irregularities

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावून नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य सेवेत हलगर्जीपणा, अनियमितता अथवा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे सक्त निर्देश आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी दिले.

nanded news
Nanded : पाण्याअभावी मोसंबीची बाग जेसीबीने केली जमीनदोस्त !

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दौऱ्यादरम्यान दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने ३ नोव्हेंबर रोजी डॉ. कंदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. आरोग्य संवाद यात्रेदरम्यान काही ठिकाणी कामकाजात आढळलेल्या त्रुटी व अनियमिततांची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी, दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि आवश्यकतेनुसार बदलीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील प्रत्येक अधिकाऱ्याची कामानुसार जबाबदारी निश्चित करून कामकाजाचे नियमित मूल्यमापन करण्यावरही त्यांनी भर दिला.

सर्व आरोग्य संस्थांमध्ये २४ तास अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध ठेवाव्यात. रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास सांगू नये. जीवनावश्यक व जीवनरक्षक औषधांचा पुरेसा साठा, १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवा, प्रयोगशाळा तपासण्या आणि एक्स-रे सुविधा नियमित उपलब्ध ठेवाव्यात. वैद्यकीय उपकरणे कार्यान्वित ठेवून त्यांची नियमित देखभाल करावी. रुग्णालयातील स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, रुग्णांना दिला जाणारा आहार आणि कंत्राटी सेवांचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

nanded news
Water Supply : दिवाळीनंतर मिळणार ७ दिवसांआड पाणी !

आरोग्य सेवा, कर्मचारी उपस्थिती, औषधसाठा, वैद्यकीय सुविधा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा डॉ. कंदेवाड यांनी दिला. नागरिकांना दर्जेदार, तत्पर, पारदर्शक व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हेच आरोग्य विभागाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.