

Water to be supplied once every 7 days after Diwali!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात झालेला अत्यल्प पाऊस, दिवसेंदिवस भूगर्भातील पाणी पातळीत होत असलेली प्रचंड घट आणि पिण्यायोग्य उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता जिल्हा व मनपा प्रशासन पाणी पुरवठ्याबाबत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दिवाळीनंतर शहरवासीयांना ७ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती आता समोर आली आहे.
नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उन्हाळ्यापुर्वीच तीव्र पाणी टंचाई - जाणवण्याची शक्यता असून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्याच्या - उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर दिसत आहे. सध्या काही गावे व वाडी-तांड्यावर टँकरने पाणी पुरवठा सुरु असला तरी टँकरच्या तसेच गावांच्या संख्येत - आणखी वाढ होईल, असे सांगण्यात येते.
शहरात सध्या ४ ते ७ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असल्यामुळे - आणि जून-जुलैमध्येही पाऊस पडेलच, - याची शाश्वती नसल्यामुळे - काटकसरीने पाणी पुरवठा करण्याची - प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. - दिवाळीनंतर शहराला होणारा पाणी पुरवठा सात दिवसआड करण्याचे - नियोजन असल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे.
नागरिकांनी आतापासूनच पाणी साठविण्याची साधने जमा करण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडेठाक असून विहिरी व बोअरही बंद पडले आहेत. प्रचंड उकाडा आणि बाष्पीभवनामुळे उपलब्ध पाणी पातळीही खोलवर गेली आहेत. दरम्यान शहरातील अनेक भागातत टोलेजंग इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होत असल्याचे बघायला मिळत आहे.
आ. कल्याणकर यांची तत्परता
संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मतदारसंघात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आ. बालाजी कल्याणकर यांनी आतापासूनच टँकर्स उपलब्ध करून ठेवले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या टँकर्सचा शुभारंभ झाला आहे. महापालिका प्रशासनानेही पाणी कपातीसोबतच अशा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे.