Ajit Gopchade : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

खा. डॉ. अजित गोपछडे यांचा देगलूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद
Maharashtra Drought Relief
Ajit Gopchade pudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीबद्दल खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी आभार मानले. दुष्काळाच्या संकटात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांना आवश्यक शासकीय मदत आणि नुकसानभरपाई लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.

देगलूर तालुक्यातील शेवाळा, शेळगाव, तमलुर, मंडगी फाटा, नरंगल, सुंडगी फाटा, चैनपूर, खानापूर, करडखेड, मरखेल, आणि हणेगाव येथे खा. डॉ. अजित गोपछडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळामुळे शेतीसमोर निर्माण झालेली आव्हाने, पिकांचे नुकसान, जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न आणि शासकीय मदतीची आवश्यकता यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा केली.

Maharashtra Drought Relief
Nanded Crime : सिडकोत भाड्याच्या घरातील अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा छापा!

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पिकांचे नुकसान आणि शेतीच्या उत्पन्नात घट झाल्याने आगामी रब्बी हंगामाची तयारी करणेही शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक आधार देणारी ठरणार आहे. मात्र, दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत आणि नुकसानभरपाई वेळेत मिळणे गरजेचे आहे.

दरम्‍यान, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि प्रशासकीय स्तरावरून पात्र शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देणे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खा. डॉ. गोपछडे यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या शेतीच्या पुढील हंगामासाठी आवश्यक सहकार्य मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा या संवादातून व्यक्त झाली.

Maharashtra Drought Relief
Drought Compensation: ‘शेतकऱ्यांना ५ हजारांची भीक नको, हक्काची मदत द्या’; शेकापचा सरकारला इशारा

यावेळी माधवराव मिसाळे, शिवाजीराव देशमुख , प्रकाश पाटील, ॲॕड. प्रीतम देशमुख, शिवकुमार देवाडे, अशोक साखरे, ताराकांत पाटील नरंगलकर, अंबादास पाटील, प्रशांत पाटील, यादवराव पाटील, संतोष पाटील, शिवराज हांडे, मारुती हनेगावे, अशोक डुकरे, लक्ष्मण धनसुरे, मोहन पाटील, बसवंत गोपछडे, रुपेश पाटील, भास्कर परबते, प्रदीप वाघमारे, विक्रम घुळेकर , शिवकांत माळगे, राजेंद्र ऊळगड्डे, संजीव पांचाळ, शिवकांत घडले, अंबादास कहांडे, रामलिंग स्वामी, योगेश मुरग, विनायक पटणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news