Nanded gambling raid : जुगारावर छापा; ७ जणांना पकडले, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

देगलूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Nanded gambling raid
Nanded gambling raidpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत देगलूर पोलिसांनी नवीन हावरगा येथे चालू असलेल्या ‘तिर्रट’ जुगार अड्ड्यावर धाड टाकून ७ जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रकमेसह तीन दुचाकी व जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक हनमंत शिंदे व त्यांचे पथक गस्तीवर असताना, नवीन हावरगा येथील पडीक अंगणवाडी समोरील मोकळ्या जागेत काही जण पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी तात्काळ छापा टाकला.

Nanded gambling raid
Nanded illegal sand mining : अवैध वाळू उपशावर डीआयजींच्या पथकाचा सर्जिकल स्ट्राईक

​या कारवाईत ज्ञानेश्वर जांभळे (३७, रा. बामणी), अनिल गवळवाड (३०, रा. मुजळगा), अशोक राव (३५, रा. हावरगा), साहेबराव ढवळे (३६, रा. हावरगा), शुद्धोधन ऊर्फ सिद्धार्थ कांबळे (३२, रा. मुजळगा), सायलु बरसमवार (२८, रा. हावरगा) आणि भीमराव बरसमवार (३५, रा. हावरगा) या सात जणांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून ५,३३० रुपयांची रोख रक्कम, पत्ते आणि १,९५,००० रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ व पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि हनमंत शिंदे, किरणकुमार वाघमारे व विशाल अटकोरे यांनी केली.

Nanded gambling raid
Missing Teacher Purna | संस्थाचालकाच्या धमकीनंतर शिक्षक बेपत्ता; पूर्णेत खळबळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news