Nanded Crime News : जेवणाच्या ताटावरून उठला; तरुणाने जीव गमावला

भांडण सोडवताना तरुणाचा मृत्यू
nanded crime news
जेवणाच्या ताटावरून उठला; तरुणाने जीव गमावलाFile Photo
Published on
Updated on

Death of a young man who went to resolve a dispute

नांदेड, पुढारी वृत्तसेवा

भावकीतील भांडण सोडविण्यासाठी जेवण्याच्या ताटावरुन उठला आणि तरुणाने जिव गमावला. ही घटना अर्धापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे शनिवारी रात्री घडली. तरुणांच्या मृत्यू नंतर या तरुणाच्या नातेवाईकांनी संशयिताच्या घरावर हल्ला केल्याने परिसरात कांही काळ तणाव निर्माण झाला होता.

nanded crime news
Unseasonal Rain Nanded | अवकाळीचा तडाखा ! पैनगंगा अभयारण्य परिसरातील ७५ टक्के पिकांचे मोठे नुकसान

घटनेवावत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अधापूर शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेव आंबेडकर नगरात चांदु दिगंबर वाघमारे यांचे घर असून - त्यांच्या शेजारी असलेल्या ४ जणांनी क्षुल्लक कारणावरून चांदू दिगंबर वाघमारे यांच्याशी वाद घातला.

या वादाचे भांडण व हाणामारीत रुपांतर झाले. शेवटी वाढत चाललेले भांडण सोडवण्यासाठी त्यांचा मुलगा व्यंकटी चांदु वाघमारे (वय २५ वर्षे) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत व्यंकटी चांदु वाघमारे यांना चौघाजणांनी लाथाबुक्क्यांनी गुप्तांगावर जबर मारहाण करून रस्त्यावरील दुभाजकावर आपटुन जीवे मारले, अशी फिर्याद मयताच्या पत्नीने अर्धापूर पोलीस ठाण्यात दिली.

nanded crime news
भंगार विक्रीतून दक्षिण मध्य रेल्वेने कमावले २३ कोटी

या फिर्यादीवरून मधु तांदुळकर, गणेश तांदुळकर, मारोती तांदुळकर, लता तांदुळकर या ४ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूअसली तरी भांडणातील या चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मयताच्या उत्तरीय तपासणी नंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news