

death Maruti Chitampally, memories past revived Nanded
विशेष प्रतिनिधी
नांदेड : 'चितमपल्ली गेले... निःशब्द भानावस्था...' मुंबईतील लेखक-नाटककार प्रल्हाद जाधव यांची एका ओळीतील शोकसंवेदना गुरुवारी सकाळी अनेकांना वाचायला मिळाल्यानंतर तब्बल २० वर्षांपूर्वीच्चा मारुती चितमपल्ली यांचा नांदेडमधील सत्कार, नंतरची प्रकट मुलाखत तसेच लेखक म्हणून याच शहरात झालेली त्यांची जडणघडण अशा अनेक आठवणीना उजाळा मिळाला,
राज्याच्या वन विभागात तब्बल ३६ वर्षे सेवा बजावताना संस्कृतसह काही परदेशी भाषाही शिकलेल्या मास्ती भुजंगराब चित्तमपल्ली या अवलियाने मराठी साहित्य व्यवहारात मोलाची भर घातली. सेवानिवृत्तीनंतरही दीर्घकाळ जंगल आणि तेथील जीवनाचा अभ्यास करणाऱ्या या लेखकास ७९व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूपविण्याची संधी मिळाली, यानिमित्ताने त्यांचे महाराष्ट्रात नागपूरसह ठिकठिकाणी सत्कार सोहळे झाले; पण नदिडमध्ये झालेली त्यांची प्रकट मुलाखत अत्यंत संस्मरणीय होती, असे चितमपल्ली यांचा वडिलबारी स्नेह लाभलेले निसर्गप्रेमी छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी येथे नमूद केले.
वनखात्याच्या सेवेमध्ये आरंभीच्या काळात चितमपल्ली यांनी नांदेड जिल्ह्यातील झलापूर येथे कर्तव्य पार पाडले होते. नदिडमधील वास्तव्यातच त्यांनी संस्कृतचे धडे घेत या भाषेतील साहित्याचे अध्ययन केले. नांदेड जिल्ह्यातील वास्तव्यात विख्यात समीक्षक नरहर कुरुंदकर यांच्याशी त्यांचे स्नेहबंध जुळले माझ्यातील लेखक कुरुंदकर यांनीच घडवला आणि मग साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंतांकडून लेखन प्रेरणा मिळत गेली, असे चितमपल्ली यांनी नोंदवून ठेवले आहे.
त्यांच्या 'पक्षी जाय दिर्गतरा' या पहिल्याच पुस्तकाला कुरुंदकरांनी प्रस्तावना लिहिली होती. या पार्श्वभूमीवर नांदेडशी निर्माण झालेले त्यांचे नाते उत्तरोत्तर त्व होत गेले, असे ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी सांगितले, मारुती चितमपल्ली कुरूंदकर यांच्याकडे प्रथम आले तेव्हा माझा त्यांच्याशी परिचय नव्हता. नंतर कुरुंदकर यांनीच त्यांच्याविषयीची माहिती दिल्याची आठवणही प्रा. भगत यांनी गुरुवारी येथे सांगितली. साहित्य संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर चितमपल्ली यांच्या नांदेडमधील सत्कार सोहळ्यासाठी सुधाकरराव डोईफोडे, प्रभाकर कानडस्खेडकर, देवोदास फुलारी, विजय होकर्णे प्रवृतींचा पुढाकार होता. दुसच्या दिवशी त्यांची प्रकट मुलाखत प्रा. विजय दिवाण आणि प्रल्हाद जाधव यांनी घेतली.
त्या मुलाखतीत जंगल, बन्य प्राणी आणि निसर्गातल्या वेगवेगळ्या चमत्कारांची माहिती श्रोत्यांना देतानाच त्यांनी पर्यावरण आणि जंगल संरक्षण हा विषय लहान मुलांना शाळेतून शिकविण्याचे आग्रही प्रतिपादन केले होते.
वरील कार्यक्रमांत चितमपल्ली यांना देण्यात आलेले मानपत्र, त्याचे लेखन वाचन आणि सादरीकरण त्याबाबतीत अनोखे नि लक्षवेधी ठरले होते. प्रल्हाद जाधव यांनी लिहिलेल्या त्या मानपात्राचे वाचन त्या काळातील प्रख्यात निवेदक प्रदीप भिडे यांनी स्टुडिओत केले होते. त्याचे ध्वनीमुद्रण नांदेडच्या श्रीत्यांना ऐकविण्याचा नवीन प्रयोग केला गेला, तोच संस्मरणीय ठरल्याचे निरीक्षण पत्रकार महेश राजे यांनी नोंदविले.
मारुती चितमपल्ली यांनी ८१ व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा विजय होकर्णे व इतर निसर्गप्रेमींच्या पुढाकारातून सन २०१३ साली त्यांचा सहस्वचंद्रदर्शन सोहळा साजरा करण्यात आला. 'याच कार्यक्रमात मारुती वितमपल्ली: एक अरण्ययात्री' या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. दिवंगत सुधाकरराव डोईफोडे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत चितमपल्ली यांची वृक्षतुला करण्यात आली होती. हा कार्यक्रमही आगळावेगळा ठरला होता.