D-Gang : डी गँगच्या रवी ठाकूरच्या मुसक्या आवळल्या

नांदेड एलसीबीची कारवाई; दोन पिस्टल, तीन मॅग्जीन, १० काडतुसे जप्त
nanded news
D-Gang : डी गँगच्या रवी ठाकूरच्या मुसक्या आवळल्याile photo
Published on
Updated on

D-Gang's Ravi Thakur has been arrested

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील डी गंगचा सदस्य असलेला कुख्यात गुंड रवी नारायण सिंग ठाकूर (३८) याच्या नांदेडच्या एलसीबी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून दोन पिस्टल, तीन मॅग्जीन आणि १० काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एलसीबीने ही कारवाई बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथील बसस्थानक परिसरात गुरुवारी (दि.१९) केली.

nanded news
Beed crime news: दोन लाखांचं बनावट लग्न प्रकरण! नवरीसह बनावट मावशी पोलिसांच्या ताब्यात, दोघे अद्याप फरार !

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑपरेशन फ्लॅश आऊट सुरू केले आहे.

गुरुवारी एलसीबीचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल घोगरे यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिंचाळा येथील बसस्थानक परिसरात नांदेड येथील डी गंगचा गुंड रवी ठाकूर येणार असल्याची टीप मिळाली होती.

nanded news
MD Ddrugs Selling Case : कन्नडमधून आणलेले एमडी ड्रग्ज विकताना दोघे जेरबंद

त्यानुसार एलसीबीच्या पथकाने सापळा रचून रवी ठाकूरला ताब्यात घेत त्याची अंग झडती घेतली. अंगझडतीत त्याच्याजवळ दोन पिस्टल, तीन मॅग्जीन आणि १० काडतुसे मिळाली. पोलिसांनी ते जप्त करून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news