नांदेडमध्ये ५० किलो अंमली पदार्थासह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, दोन आरोपींना अटक, दोघे फरार
nanded news
नांदेडमध्ये ५० किलो अंमली पदार्थासह १५ लाखांचा मुद्देमाल जप्तfile photo
Published on
Updated on

Contraband and other items worth ₹15 lakh, including 50 kg of narcotics, seized in Nanded.

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी ५० किलो ६३० ग्रॅम 'पॉपी स्ट्रॉ (अफीमच्या बोंडांचे तुकडे) या अंमली पदार्थासह एक चारचाकी आणि एक दुचाकी, असा एकूण १५ लाख ९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन मुख्य पुरवठादार फरार आहेत.

nanded news
Telangana Ganja Smuggler-तेलंगणाचा गांजा तस्कर जेरबंद

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, गुजरात राज्यातील नोंदणी क्रमांक (GJ-10-CN-3070) असलेल्या कारमधून अंमली पदार्थ विक्रीसाठी नांदेडमध्ये आणले जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह जुना कौठा परिसरातील साईबाबा मंदिराजवळ सापळा रचला. संशयित वाहन येताच पोलिसांनी ते थांबवून त्याची कसून झडती घेतली.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल घोगरे, पोलीस अंमलदार सुनील गटलेवार, शीतल साळुंके, राजीव बोधगीर, साहेबराव कदम, गणेश यादव व गोविंद राठोड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यात अंमली पदार्थ, अवैध दारू, शस्त्रे आणि वाळू तस्करीविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असून, नागरिकांनी बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

nanded news
Jalna illegal sand mining : अवैध वाळूसह 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी अंमली पदार्थांसह गुन्ह्यात वापरलेली कार आणि एक दुचाकी (MH-26-BS-2006) जप्त केली आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.

दोन आरोपींना अटक, दोघे फरार

कारची तपासणी केली असता त्यात ५० किलो ६३० ग्रॅम वजनाचे पॉपी स्ट्रॉ आढळून आले. पोलिसांनी तात्काळ वाहनातील प्रीतसिंग रामसिंग पुजारी (वय २३, रा. गुरुद्वारा गेट क्र. ४, नांदेड) आणि शामला चिंतामणी पोहरे (वय ४५, रा. चिखलवाडी, गुरुद्वारा गेट क्र. २, नांदेड) या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हा अंमली पदार्थांचा साठा मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यातील गौरीशंकर राजुलाला मालवी (रा. मोडी) आणि धनराज दनगर (रा. राममोडी) यांच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही मुख्य आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news