Nanded MLC Election Result : काँग्रेसने राखलेल्या 'कुळा'वर भाजपाचा प्रथमच ताबा !

नांदेड मनपातील यशानंतर चव्हाणांची पक्षाला आणखी एका विजयाची भेट
Nanded MLC election
Nanded MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

संजीव कुळकर्णी

नांदेड : मराठवाड्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाची दयनीय घसरण झाल्यानंतर सध्याच्या घडीला राज्य विधान परिषदेत मराठवाड्यातून काँग्रेसचा एकही प्रतिनिधी नाही. मागील काळात या पक्षाने परिषदेत स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ, राज्यपाल नियुक्त किंवा अन्य माध्यमांतून अनेक कार्यकर्त्यांना परिषदेत सामावून घेतले होते. नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघावर तर या पक्षाने तब्बल ५० वर्षे आपले 'कुळ' राखले; पण २०२६च्या मध्यास ते संपुष्टात आले असून त्यावर आता प्रथमच भाजपाने ताबा मिळवला आहे.

काँग्रेसचे माजी नेते दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या पश्चात अशोक चव्हाण यांनी वरील मतदारसंघात विरोधकांना झेंडा फडकवू दिला नाही पण शंकररावांच्या पश्चात भाजपात गेलेल्या त्यांच्या पुत्राने आपले समर्थक अमरनाथ राजूरकर यांना भरघोस मतांनी निवडून आणताना या मतदारसंघावर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवला आहे. विशेष हे की, राजूरकर हे या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा निवडून येणारे जिल्ह्यातील पहिले उमेदवार ठरले आहेत.

Nanded MLC election
Opposition to Casinos in Goa - गोव्यात कॅसिनोला वाढता विरोध

वरील मतदारसंघ मर्यादित मतदारांचा असला, तरी निवडून येण्यासाठी मात्र अत्यंत सखार्चिक तसेच बेहिशोबी आणि महागडा. दोन-तीन आठवडे एकेका मतदारास जपावा लागणारा. पूर्वी दोनदा विजय प्राप्त केल्यामुळे राजूरकरांना त्यातील सर्व बारकावे, खाचखळगे ठाऊक होते. हा पूर्वानुभव त्यांच्या कामी आला. जमेची बाजू म्हणजे त्यांच्यामागे देशातील अव्वल आणि श्रीमंत पक्षाची साथ होती. दुसरी बाब म्हणजे त्यांच्या विरोधात सशक्त, तोलामोलाचा उमेदवार नव्हता. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. नांदेडच्या या मतदारसंघात भाजपाने आपले खाते दणक्यात उघडले. हेच या निकालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाईल.

नांदेड जिल्ह्यातून विधान परिषदेवर गेलेले पहिले प्रतिनिधी म्हणजे शंकरराव चव्हाण. ते साल होते, १९५६. त्यानंतरच्या काळात आबासाहेब लहानकर, ईश्वरराव भोसीकर, श्यामराव कदम, गोविंदराव झरीकर, साहेबराव बारहकर, बळवंतराव चव्हाण, बाजीराव शिंदे, अशोक चव्हाण यांना काँग्रेसने वेगवेगळ्या कालखंडात परिषदेमध्ये पाठविले. वसंतदादा पाटील यांनी नांदेहच्या फारूक पाशा यांना १९७८ साली 'सांगली स्थानिक प्राधिकारी मधून निवडून आणले. किशन राठोड, कमलकिशोर कदम, अमर राजूरकर प्रभूतींनी 'स्थानिक प्राधिकारी'च्या निवडणुकीतून विधिमंडळाच्या वरच्या सभागृहात झोप घेतली.

भाजपाची वाटचाल ५०व्या वर्षाकडे सुरू आहे; पण या पक्षाने आजवर नांदेडमधून केवळ राम पाटील रातोळीकर यांना परिषदेवर संधी दिली. आता राजूरकर हे परिषदेवर जाणारे जिल्ह्यातले दुसरे भाजपा कार्यकर्ते ठरले आहेत प्रवेश केला. दोन-सव्वा दोन वर्षांनंतर त्यांना वा पक्षांतराची बक्षिसी भाजपाकडून मिळाली आहे. या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळताच, त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. तसा तो झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांचे राजकीय पुनर्वसन करायचे होते, ते त्यांनी पक्ष व खा. चव्हाण यांच्या माध्यमातून केले.

वरील निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यावर भाजपाकडे अन्य कार्यकर्त्यांनीही उमेद‌वारी मागितली होती, तरी पक्षनेतृत्वाने राजूरकर यांना पसंती दिली. काँग्रेसतर्फे १२ वर्षे वरील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर राजूरकर यांनी २०२४मध्ये अशोक चव्हाणांच्या 'झब्ब्याचा काठ' धरत भाजपामध्ये प्रवेश केला. दोन-सव्वा दोन वर्षांनंतर त्यांना वा पक्षांतराची बक्षिसी भाजपाकडून मिळाली आहे. या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळताच, त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. तसा तो झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांचे राजकीय पुनर्वसन करायचे होते, ते त्यांनी पक्ष व खा. चव्हाण यांच्या माध्यमातून केले.

नांदेड मनपातील घसघशीत विजय आणि सत्ताप्राप्तीनंतर चव्हाण यांनी भाजपाला आणखी एक यश मिळवून दिले. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या या प्रभावशाली नेत्यास भाजपाने पक्षात घेतल्यावर लगेचच राज्यसभेवर पाठविले. मुख्यमंत्रीपद भूषविलेला नेता केंद्रात केवळ खासदार राहत नाही, त्याला मंत्री केले जाण्याची जुनी परंपरा आहे; पण भाजपाने चव्हाण यांना अजूनही वेटिंगवर ठेवले आहे. राजूरकरांच्या विजयाचा आनंद साजरा करत असताना चव्हाण समर्थकांच्या मनात एक सल आहे, ती म्हणजे आपला नेता केंद्रीय मंत्रिमंडळात नसल्याची. पण या पक्षात लॉबिंग, मोर्वेबांचणी वर्ज्य असल्यामुळे प्रतीक्षा करण्याशिवाय त्यांना काहीही करता येत नाही.

Nanded MLC election
Goa BJP Executive Committee Meeting | विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी

शंकरराव चव्हाण १९८० ते १९९६ ह्या काळात बहुतांश काळ केंद्रात मंत्री होते. त्यांच्यांनतर नांदेडला वास्तव्य करणाऱ्या सूर्यकांता पाटील यांना राष्ट्र‌वादी काँग्रेसने केंद्रात राज्यमंत्री केले. नंतरच्या १७ वर्षात नांदेडमधून कोणालाही केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. भाजपा नेते नरेन्द्र मोदी आणि अमित शहा हे अशोक चव्हाण यांना चांगले ओळखतात; पण ते मराठवाड्याच्या या नेत्याच्या मंत्रिपदासाठी कथी विचार करणार, हा प्रश्न राजूरकरांच्या विजयाच्या निमित्ताने भाजपाला मिळालेल्या यशानंतरही कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news