Indian Census 2026 : प्रगणकांना दिलेला नकाशा अन्‌‍ चर्तुसीमेत मोठी तफावत!

प्रत्यक्षात काम करणाऱ्यांना मोठ्या अडचणी
Indian Census 2026
प्रगणकांना दिलेला नकाशा अन्‌‍ चर्तुसीमेत मोठी तफावत!pudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः भारतीय जनगणनेचा पहिला टप्पा असलेल्या घर गणनेला शनिवार (दि.16) पासून सुरुवात झाली असून घरगणनेच्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान प्रशासनाने प्रगणकांना दिलेला नकाशा व त्यासोबत जोडलेल्या चर्तुसीमा यांच्यात मोठी तफावत आढळून येत असल्याने पर्यवेक्षक व प्रगणक संभ्रमात दिसून आले.

भारतीय जनगणना-2027च्या राष्ट्रीय कार्याला 1 मेपासून सुरुवात झाली. 1 मे ते 15 मेदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना स्वगणनेचा कालावधी ठरवून दिला होता. या दरम्यान जनगणनेचे राष्ट्रीय कार्य करणाऱ्या पर्यवेक्षक, प्रगणक यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले.

Indian Census 2026
Vasai Virar water supply issue : महानगरपालिका पाणीपुरवठा विभागात नियोजनाचा अभाव

या दरम्यान प्रशिक्षित प्राध्यापकांनी घरगणनेचे राष्ट्रीय कार्य करताना नकाशा कशाप्रकारे काढायचा तसेच ॲपच्या माध्यमातून घरगणना कशाप्रकारे करायची, ॲपमधील नकाशाचा वापर कशाप्रकारे करायचा याबाबत प्रगणकांना माहिती दिली.

शनिवार (दि.16) रोजी पर्यवेक्षक व प्रगणक प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यासाठी गेले असता प्रशासनाने ॲपमध्ये दिलेल्या नकाशात व चर्तुसीमा यामध्ये मोठी तफावत दिसून आली. याबात ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून काही पर्यवेक्षक व प्रगणक यांनी मार्ग काढला, तर काही प्रगणक स्थळपाहणी न करताच माघारी परतल्याचे सांगण्यात आले. याबाबत जनगणनेचे कार्य करणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

Indian Census 2026
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुढील काही तासांत हवामान बदलणार; मुंबई, रायगडसह कोकणात पावसाचा इशारा

जनगणना किटमधील साहित्याचा तुटवडा!

जनगणनेचे राष्ट्रीय कार्य हाती घेतलेल्या पर्यवेक्षक-प्रगणक यांना शासनाकडून किट देण्यात आली. नांदेडच्या तहसील प्रशासनाने माहिती पुस्तिका, मार्करपेन आदी साहित्य दिले. मात्र या किटमधील बॅग, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, टोपी, पेन आदी साहित्य प्रगणकांना मिळाले नसल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news