

Chief Minister took a good decision regarding the district bank: Chavan
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतल्या नोकरभरतीमध्ये काय काय ठरलं होतं, ते सर्व जनतेसमोर आलं. पण या बँकेत सामान्यातल्या सामान्य उमेदवारांना संधी मिळावी, नोकरभरतीची प्रक्रिया पारदर्शीपणे व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतल्याची प्रशस्ती माजी मुख्यमंत्री, भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी लोहा येथे बोलताना दिली. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख त्यांनी वारंवार आमचे नेते-देवाभाऊ असा केला.
कंधार-लोहा तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस गुरुवारी लोहा येथे आले होते. भाजपाने लोह्यामध्ये माजी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. लोह्याच्या विकासासाठी विघ्न दूर करणारा गजाननच हवा, असे खा. चव्हाण यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य वेगाने पुढे चाललेले आहे. त्यांनी विकसित महाराष्ट्राची कल्पना मांडली असून त्या दिशेने सर्वच क्षेत्रांमध्ये कामे सुरू आहेत. त्यात मराठवाडा मागे राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करून खा. चव्हाण यांनी नांदेड जिल्हा बँकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यामध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचा आवर्जून उल्लेख केला. हे प्रकरण दैनिक पुढारी'ने उघड करून धसास लावले.
नोकरभरतीसंदर्भात शासनाने आता घेतलेल्या निर्णयामुळे गैरप्रकार आणि भ्रष्टाचारास वाव राहणार नाही. आयबीपीएस, टीसीएस किंवा एमकेसीएल या त्रयस्थ संस्थांच्या माध्यमातूनच नोकरभरती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून प्रत्येक जिल्हा बँकेमध्ये स्थानिक उमेदवारांसाठी ७० टके जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. ही बाब महत्त्वाची गतिरोधक उखडून टाका
खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे विरोधक असलेले लोहा कंधार भागाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा थेट उल्लेख केला नाही; पण विकासातील गतिर-ोधक उखडून टाकले पाहिजेत, विरोधकास शिव्या देऊन विकास होत नाही. अशा शब्दांत फटकारे लगावले. राज्याच्या तिजोरीची चाबी कोणाकडेही असली, तरी या तिजोरीचे नियंत्रण मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.