

नांदेड : शहरातील जुना मोंढा भागात तेल व्यापाऱ्याची गाडी पंक्चर करून २९ लाख रुपयांची बॅग पळवल्याच्या खळबळजनक घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. या प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीच्या मुख्य सूत्रधाराला कर्नाटकातील शिमोगा येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याच्याकडून १८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
वजिराबाद पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, १८ डिसेंबर रोजी जुना मोंढा भागातील तेल व्यापारी पारसेवार हे दुकानातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी २९ लाख रुपयांची तांत्रिक विश्लेषण केले. या तपासातून ही चोरी कर्नाटकातील बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचे लोकेशन मिळताच पोलीस पथकाने कर्नाटकातील शिमोगा येथे धाव घेतली. तेथे चार दिवस पाळत ठेवून मुख्य आरोपी चंद्रशेखर ओमप्रकाश छत्री याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे चोरीतील १८ लाख रुपये मिळून आले आहेत.
रोकड असलेली बॅग कारच्या सीटवर ठेवली होती. मात्र, गाडीचे टायर पंक्चर असल्याचे लक्षात आल्याने ते खाली उतरून पाहत होते. हीच संधी साधून पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी गाडीतील पैशांची बॅग घेऊन दुचाकीवरून पोवारा केला होता. पोलिसांच्या चौकशीत मुख्य आरोपीने आपल्या साथीदारांची नावे उघड केली आहेत. यात अजय बाबू जाधव (उर्फ अजय फकीरा नायडू), नंदकुमार दिलीप चंदू (उर्फ शंकर राजू भाई) आणि अंजनेल्ल ओमप्रकाश छत्री यांचा समावेश आहे.
२०० सीसीटीव्ही फुटेज तपासले
या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तपासासाठी चार स्वतंत्र पथके रवाना केली होती. पोलिसांनी परिसरातील सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच ५० हून अधिक संशयितांचे सायबर फूटप्रिंट्स तपासून तांत्रिक विश्लेषण केले. या तपासातून ही चोरी कर्नाटकातील बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचे लोकेशन मिळताच पोलीस पथकाने कर्नाटकातील शिमोगा येथे धाव घेतली. तेथे चार दिवस पाळत ठेवून मुख्य आरोपी चंद्रशेखर ओमप्रकाश छत्री याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे चोरीतील १८ लाख रुपये मिळून आले आहेत.