Nanded News : योग्य पद्धतीने स्तनपान केल्यास बालकांचे आरोग्य सुदृढ बनते

नांदेड जिल्हा परिषदेचा स्तनपान जागृती सप्ताह
Nanded News
Nanded News : योग्य पद्धतीने स्तनपान केल्यास बालकांचे आरोग्य सुदृढ बनतेFile Photo
Published on
Updated on

Breastfeeding properly improves the health of children.

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: आईचे दूध हे बाळासाठी साक्षात अमृत या भावनेला मूर्त रूप देते. त्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेने स्तनपान व पोषणविषयक जागृतीसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

Nanded News
Vande Mataram : वंदे मातरम् चळवळीतील स्वातंत्र्यसैनिकांचा राज्य सरकारला विसर

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. यासाठी आयआयटी मुंबई येथील पोषण तज्ज्ञांचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे. सुरुवातीस महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागातील निवडक क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना स्तनपान तसेच बालपोषण या विषयावर कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान मार्गदर्शक पुस्तिका व पूरक साहित्य पुरविण्यात आले.

यानंतर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांना योग्य मार्गदर्शन सुरू केले. मातांच्या व बालकांच्या आरोग्य निर्देशांकावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून, त्याद्वारे सातत्याने आरोग्य माहिती नोंदवली जाते.

Nanded News
Heavy Rains Loss : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे दीड हजार कोटींवर नुकसान

यामुळे जन्मावेळी कमी वजनाची असलेली मुले आता सुदृढ आणि गोंडस दिसत आहेत. आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका मातांना योग्य पद्धतीने स्तनपान कसे करावे, बाळाला कसे धरावे, किती वेळा दूध पाजावे याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केल्या जात आहे.

माता बालकांच्या आरोग्यात होतेय सुधारणा जिल्ह्यातील काही भागात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रयत्नांमुळे माता-बाल आरोग्यात लक्षणीय सुधारणा होत आहे. या उपक्रमाचा विस्तार जिल्ह्यातील इतर भागांपर्यंत विस्तारित केली जाणार आहे आहे.
डॉ. संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news