

BJP's petition dismissed by District Sessions Court
मुखेड, पुढारी वृत्तसेवा : मुखेड नगर परिषदेची १० प्रभागांतील २० जागांसाठी भाजपा-कांग्रेस आणि शिंदे गटामध्ये चुरशीची निवडणूक होत आहे. अर्जाच्या छाननी प्रक्रियेनंतर शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे व इतर १२ जणांवर भाजपाने आक्षेप घेतला होता. पण निवडणूक निर्णय अधिका यांनी सर्व अक्षेप फेटाळल्याने, भाजपा नगरसेवक पदाच्या व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निकाला विर-ोधात जिल्हा व सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिकाजिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.२५) फेटाळून लावल्याने, शिंदे गटातर्फे जल्लोष करण्यात आला.
मुखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपा-कांग्रेस आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) चुरशिची लढाई बघायला मिळत आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेनंतर भाजपाने विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर अपत्य, जात प्रमाणपत्र तसेच शपथपत्रात मूळ मालमत्ता दर्शवली नसल्याचा आक्षेप घेत अर्ज अवैध करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु, त्यांची ही मागणी नाकारत अर्ज वैध केले.
त्यामुळे भाजपाने जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल मंगळवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संतोष देशमुख यांनी फेटाळली. भाजपाच्या वतीने अड. मिलिंद एकताटे व अड. महेश कनकदंड, शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) अड. उमेश मगदे यांनी युक्तिवाद केला. तर अॅड. महेश कांगणे यांनी सरकारकडून बाजू मांडली.