Nanded BJP | अनधिकृत ध्वनीक्षेपकांविरोधात तत्काळ कारवाई करा: भाजपची मागणी

किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन
Sound Pollution Complaint Nanded Kinwat police
किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देताना भाजप शहर मंडळाचे कार्यकर्ते (Pudhari Photo)
Published on
Updated on

Sound Pollution Complaint Nanded Kinwat police 

किनवट : ध्वनीप्रदूषण नियंत्रण व विनियमन नियम २००० आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे भाजप शहर मंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. स्थानिक स्तरावर वाढत्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाने क्रिमिनल रिट याचिका क्र. ४७२९/२०२१ मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणेला ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. मस्जिद वा मदरसा परिसरात वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकरमुळे नियमबाह्य पातळीचे ध्वनीप्रदूषण होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, पर्यावरणीय ध्वनी मर्यादा काटेकोरपणे पाळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Sound Pollution Complaint Nanded Kinwat police
Nanded-Pune Vande Bharat : डिसेंबरपर्यंत नांदेड-पुणे वंदेभारत रेल्वे सुरू होणार !

सर्वोच्च न्यायालयाच्या २००५ मधील निर्णयाचा हवाला देत, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही प्रकारचे ध्वनीप्रदूषण टाळण्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तसेच, नियम ३(१) व ४(१) नुसार विविध झोनसाठी निर्धारित केलेल्या डेसिबल मर्यादेचे पालन बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलिसांनी मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे ध्वनी पातळीची नोंद घेऊन, आवश्यक असल्यास ध्वनी उपकरणे जप्त करण्याची कारवाई करावी, अशा सूचनाही निवेदनात देण्यात आल्या आहेत. तक्रारी आल्यास पोलिसांनी कलम १३६ नुसार दंड आकारावा व पुन्हा तक्रार झाल्यास कलम ७० अंतर्गत उपकरण जप्त करून परवाने रद्द करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी न झाल्यास सक्षम प्राधिकरणाविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर भाजपा शहर मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेनीवार यांच्यासह रमेश राशर्लावार, रोहित चाडावार, कृष्णा पाटील, साई राचटकर, बालाजी फड, देवराव निलगिरवार, मनोहर श्रीरामे, सुशील बद्दवार, नितीन मोहरे, गणेश कोल्हे, सतीश वावडे, अक्षय भोयर, शंकर निलावार, दिग्विजय दिक्षित, जयंत मच्छर्लावार, सागर पिसारीवार, पवन गिरी, सतीश बिराजदार, राजेश दासरवार आदींच्या सह्या आहेत.

Sound Pollution Complaint Nanded Kinwat police
Nanded News : नांदेड जिल्ह्यामध्ये कंत्राटदारांची ३ हजार कोटींची देयके प्रलंबित !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news