Theft news: भोकरदनमध्ये बँकेतून पैसे काढल्यानंतर महिंद्रा पिकअपमधून रोकड लंपास

चोरी करणाऱ्या व्यक्तीचा अद्याप कोणताही ठोस मागमूस लागलेला नाही
Theft news
Theft news
Published on
Updated on

भोकरदन : तालुक्यातील कोठा जहांगीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या माध्यमातून कष्टाने जमा केलेली ९ लाख रुपयांची रक्कम बँकेतून काढल्यानंतर काही क्षणांतच चोरीला गेल्याने भोकरदन तालुक्यातील महिलांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जय योगेश्वर महिला बचत गट, कोठा जहांगीर येथील सुमारे दहा महिला भोकरदन येथील भारतीय स्टेट बँकेत (SBI) पैसे काढण्यासाठी आल्या होत्या.

Theft news
Nanded News | नायगाव तालुक्यात मुरूम-रेती साठ्याने खळबळ; चौकशी व कारवाईची ग्रामस्थांची मागणी

बँकेतून पैसे काढल्यानंतर जाफराबाद रोडवरील एका ठिकाणी त्या चहा पिण्यासाठी थांबल्या. याचदरम्यान त्यांनी काढलेली रोकड महिंद्रा पिकअप वाहनात ठेवली. मात्र, काही वेळाने ९ लाखांची रोकड गायब झाल्याचे लक्षात येताच महिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. घटनेनंतर महिलांनी परिसरात तातडीने शोधाशोध केली; मात्र चोरी करणाऱ्या व्यक्तीचा अद्याप कोणताही ठोस मागमूस लागलेला नाही.

Theft news
Nanded news : धोकादायक शाळा! रोशनगावच्या जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळीस; विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला

बँकेतून पैसे काढण्यापासून ते चोरी होईपर्यंतच्या संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असते, तर चोराचा माग काढणे पोलिसांना सोपे झाले असते, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news