Nanded Rain News : गेल्या आठवड्यात जेमतेम ३ मिमी पाऊस

शेतशिवारात साचलेल्या पाण्यामुळे अजूनही शेती अशक्य
Nanded Rain News
Nanded Rain News : गेल्या आठवड्यात जेमतेम ३ मिमी पाऊस File Photo
Published on
Updated on

Barely 3 mm of rain last week at Nanded

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याची वार्षिक सरासरी ८९१.३० मिमी आहे. तर दि. १ जून पासून दि. ५ सप्टेंबरपर्यंत अपेक्षित पाऊस ८०८.८० मिमी आहे. असे असताना सध्या १११५.६० मिमी पाऊस पडला. हवामान खाते तर अजूनही पावसाचा इशारा देत आहे. परंतु तरीही मागील आठवडा सुदैवाने कोरडा गेला असून जिल्ह्यात सरासरी जेमतेम ३ मिमी पाऊस पडला.

Nanded Rain News
Municipal Council Reservation : न.प. चे आरक्षण आज सुटणार असल्याने इच्छुकांना लागले डोहाळे

मागील सोमवारी (दि. २९) १११२.५० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या दिवशी सकाळी जिल्ह्यात सरासरी १.२० मिमी पाऊस नोंदला गेला तर रविवारी (दि. ५) सकाळी सुद्धा १.२० मिमी पाऊस नोंदला गेला. मध्यंतरीच्या दिवसात नगण्य किंवा पाऊसच पडला नाही. वातावरणात अद्याप उकाडा जाणवत असला तरी तो आणखी पाऊस पडण्यापेक्षा निश्चितच सुसह्य मानला जातो.

दरम्यान, शेतशिवारात मात्र अद्यापही पाणी साचलेले आहे. काहीसा उंच भाग वगळता अन्यत्र अद्याप शेतीची कामे करणे अशक्य झाले आहे. यावर्षी मे महिन्यात वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्हाभरात २८ मे रोजी लक्षणीय पाऊस झाला. ११ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. तत्पूर्वी दि. १७ व २२ मे रोजी अनुक्रमे दोन व तीन मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. त्यानंतर दि. १० जून रोजी ९ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मध्यंतरीचे दिवस कोरडे गेले. त्यानंतर पाऊस पडत गेला. परंतु तो किरकोळ स्वरुपाचा होता. दि. २८ जून रोजी मात्र तब्बल ३९ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. दि. ३० जून पर्यंत जिल्ह्यात सरासरी १४३.७० मिमी अर्थात वार्षिक सरासरीच्या १६.१२ टक्के पाऊस झाला.

Nanded Rain News
Nanded News : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जुलै महिन्याच्या २४ तारखेला ४ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. तर २७ जुलै रोजी १७ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. दि. ३१ जुलै रोजी वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३४८ मिमी अर्थात ३९.०४ टक्के पाऊस झाला होता. दि. ८ ऑगस्टला ५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दि. १४ ऑगस्ट रोजी ४२१.६० मिमी अर्थात वार्षिक सरा सरीच्या तुलनेत ४७.३० टक्के पाऊस झाला होता. इथून पावसाची मर्जी फिरली आणि कहर सुरु झाला. दि. १५ ऑगस्ट रोजी २७मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. या दिवशीपर्यंत जिल्ह्यात ४६७.८ मिमी तर ५२.४९ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर कधी संततधार तर कधी तडाखेबंद फलंदाजी करीत पावसाने धावफलक सतत हलता ठेवला.

दीड महिन्यात ६४५ मिमी पाऊस

दि. ३१ ऑगस्टपर्यंत ८०१.४० मि.मी. पाऊस पडला होता. वार्षिक पर्जन्यमानाच्या जवळ जाऊन तो पोचला. टक्केवारीत तो ८९.९१ एवढा झाला. दि. ३० सप्टेंबर रोजी १११२ मिमी तर टक्केवारीत १२४.७६ एवढा टप्पा पावसाने गाठला अर्थात सप्टेंबर महिन्यात सुमारे ३४ टक्के पाऊस झाला. म्हणजे ३११ मिमी पाऊस एकट्या सप्टेंबर महिन्यात पडला. वास्तविक अर्धा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना पूर्ण, अशा दिड महिन्यात तब्बल ६४५ मिमी पाऊस झाला. ऑक्टोबरची सुरुवात मात्र कोरडी झाली असून मागील पाच दिवस कोरडे गेल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news