

नांदेड ः नांदेड -वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल बघून विरोधक विमानाने थेट मुंबईला पळून गेले, अशी खरमरीत टीका भाजपचे नेते खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.चव्हाण यांनी ही टीका सोमवारी (दि.19) रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
चव्हाण पत्रकारांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, विरोधकांनी महापालिकेच्या निवडणुकीत आपल्यावर बरीच टीका केली मात्र, मतदारांनी त्याला मतांतून उत्तर दिलं आहे. ते आपण पाहत आहात, असे म्हणत धन शक्तीचा वापर मोठ्याप्रमाणात झाला, असा ही आरोप झाला मात्र, भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आमची अपेक्षा 50 उमेदवार निवडून यायची होती असेही चव्हाण म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी शहरे विकासासाठी अनुकूल आहेत. त्या शहरांचा विकास करायचा आहे.त्यात संभाजीनगर, जालना, लातूरसह नांदेडचा विकास होईल त्यासाठी आपल्याला अधिकचा, निधी ही चव्हाण म्हणाले.
विरोधकांनी निवडणुकीत आमच्याच जाहिरनाम्याची कॉपी केली, जाहिरनाम्यात फक्त आडनावं तेच आहे फक्त पुढचं नाव बदलले आहे.असे म्हणून अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खा. रवींद्र चव्हाण यांना चिमटा काढला.तसेच इतर विरोधकांनी तर साठ टक्के जाहीरनामा तर माझ्या विरोधात दिला होता, असेही खा.चव्हाण म्हणाले.
हिंद कि चादर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहा -चव्हाण
शिखांचे गुरु तेग बहाद्दर सिंघ यांच्या 350 शहीदी दिना निमित्त देशभर साजरी होत आहे. 24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे हा उत्सव होत असून, या कार्यक्रमास केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. या कार्यक्रमांत गुरु तेग बहद्दर सिंघ यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.