Beed News : शासकीय कर्मचाऱ्यांना दोन लाखांचा दंड

हेल्मेट न वापरल्याने वाहतूक शाखेची कारवाई
Pillion Rider Helmet Rule
शासकीय कर्मचाऱ्यांना दोन लाखांचा दंडpudhari photo
Published on
Updated on

बीड ः दुचाकी वाहनचालक आणि मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपासून हेल्मेटची सक्ती सोमवार (दि.19) पासून सुरू केली.नगरपालिका आणि इतर शासकीय कार्यालयात येणाऱ्या जवळपास 180 जणांनी नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानुसार 1 लाख 80 हजारांचा दंड वाहतूक शाखेने वसूल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांनी दिली.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक दुचाकी वाहनचालक आणि मागे बसणाऱ्याला हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. त्यानुसार आवाहन करून जिल्हा प्रशासनाने नियमांचे पालन करावे असे सांगितले होते. मात्र तरीही सोमवारी शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी कामावर येत असताना अनेकांनी नियमांना केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार कार्यालयाच्या दारातच उभा असलेल्या वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तपासणी करत 180 जणांवर कारवाईचा बडगा उगारला.त्यानुसार 1 लाख 80 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून वाहतूक शाखेच्या प्रभारी असलेल्या सुभाष सानप यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Pillion Rider Helmet Rule
Dharashiv News : युती-आघाडीचा ‌‘सस्पेन्स‌’ अजूनही कायम!

वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवायात सर्वाधिक प्रमाण होते ते नगरपालिकेचे. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेमधील देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठ्या कारवाया झाल्या. त्यानंतर न्यायालय, तहसील आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका देण्यात आला आहे.

दुचाकी अपघातात 388 जणांचा मृत्यू

हेल्मेट न वापरल्यामुळे तब्बल 388 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.हेल्मेटची सक्ती करण्यामागे जीव वाचणे हा प्रमुख हेतू आहे.जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करायला हवे.जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांच्या कारवाया अशाच पद्धतीने आगामी काळातही चालू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांनी दिली.

Pillion Rider Helmet Rule
Manoj Jarange Patil : अनावश्यक खर्च टाळून व्यवसायाकडे वळावे

नियमांचे पालन करणारांचा सत्कार

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सोमवारी 180 जणांवर दंडात्मक कारवाई केल्याचे एकीकडे चित्र असताना दुसरीकडे नियमांचे पालन करणाऱ्यांचा वाहतूक शाखेच्या वतीने गौरव देखील करण्यात आला. ज्या सरकारी बाबूंनी नियमांचे पालन केले आहे त्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विजय जाधवर, सिद्धांत गोरे व इतर कर्मचारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news