Ashok Chavan : निवडणूक एकतर्फीच होणार; राजूरकरांचा विजय निश्चित!

महायुतीचे सर्व नगरसेवक संपर्कात : खा. अशोक चव्हाण
Ashok Chavan
हायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी येथे वार्ताहर बैठकीत व्यक्त केला.pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : महायुतीचे सर्व मतदार आम्हाला भेटले आहेत, शिवाय आम्हाला मदत करणारे सदृश्य आणि अदृश्य हात आहेत. निवडणूक पुर्णपणे एकतर्फी असून महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी येथे वार्ताहर बैठकीत व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप महानगर कार्यालयात आयोजित वार्ताहर बैठकीत खा.चव्हाण बोलत होते. राजूरकर यांच्या विजयाबाबत कुठलीही शंका बाळगण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपा-राष्ट्रवादी-शिवसेना अशी आमची महायुती आहे, त्यामुळे महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याशी आमच्या चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले.

Ashok Chavan
MLC Election : वि. प. निवडणुकीसाठी नांदेड भाजपामध्ये तिघांची नावे चर्चेत!

विमानसेवेमुळे नांदेडची कनेक्टीव्हीटी वाढली आहे. सध्या सात विमाने सुरु आहेत. दिल्ली, हैदराबाद, गोवा, बंगळुरू, नागपूर आदी ठिकाणच्या पर्यटकांचे येणे-जाणे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कमीतकमी पैशांमध्ये प्रवास करण्यासाठी नागरिकांची चांगली सोय झाली आहे. भविष्यात नांदेडमध्ये मोठी गुंतवणूक होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे मार्गाचे कामही वेगाने सुरू आहेत. नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचे कामही प्रगतिपथावर असून येत्या काही दिवसांत त्याची रितसर औपचारिक घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहितीही खा.चव्हाण यांनी दिली. नांदेडकडे शासनाचे लक्ष असून एक उभरते शहर म्हणून नांदेड उदयास येत असल्याचे ते म्हणाले.

एक विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी मोदींनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जनतेच्या विश्वासाच्या बळावर एनडीएचे सरकार देशातील २२ राज्यात कार्यरत आहे. मागील १२ वर्षांत मोदी सरकारने ९० हून अधिक विमानतळे उभारली आहेत. वीज, इंटरनेट क्षेत्रात विक्रमी कामे झाली आहेत.

मोदी सरकारच्या १२ वर्षांची वाटचाल ही देदीप्यमान,प्रभावी असल्याचे सांगून खा.चव्हाण म्हणाले. देशाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी यांनी पहिला निर्णय शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतला आहे.

Ashok Chavan
Vinod Tawde comeback : विनोद तावडे पुन्हा संसदीय राजकारणात, ‘श्रद्धा आणि सबुरी’ला मिळाले फळ!

या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रात जी क्रांती केली, ती जनतेच्या १४७ कोटी जनतेने अनुभवली असल्याचेही खा.चव्हाण म्हणाले. या वार्ताहर परिषदेला माजी मंत्री डी.पी.सावंत, महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर, चैतन्यबापू देशमुख, संतुकराव हंबर्डे, किशोर देशमुख, प्रवीण साले आदींची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news