Chandrashekhar Bawankule | शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार : बावनकुळे

महसूलमंत्र्यांनी केली अर्धापूर तालुक्‍यातील दुष्काळी भागाची पाहणी
Nanded farmers crop loss
Nanded farmers crop losspudhari photo
Published on: 
Updated on: 

अर्धापूर : शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे दिली. अर्धापूर परिसरातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची व्यथा मांडत तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी अर्धापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांकडून पीक परिस्थिती, वीजपुरवठा, पाण्याची उपलब्धता आणि नुकसानीची माहिती घेतली.

Nanded farmers crop loss
Nanded Bidar railway line : नांदेड-बिदर रेल्वेमार्गाच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र!

दरम्‍यान, अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पीकविमा योजनेचा समन्वय साधून कार्यवाही करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करून उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्याचेही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

तसेच पंचनाम्यांमध्ये अचूकता राहावी आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी महसूल, कृषी व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना दिल्या.

Nanded farmers crop loss
Beed crime : गेवराईत हॉटेलमध्ये तरुणाला मारहाण; तरुण जखमी

दरम्‍यान, यावेळी मुदखेड आणि मुखेड तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’च्या पहिल्या यादीत समावेश झालेला नाही. या दोन्ही तालुक्यांतील पीक परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन त्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करावा, अशी मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केली.

यावेळी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार रामराव वड्कुते, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news