

Hadgaon Tribal Leaders join BJP
हदगाव : हदगाव तालुक्यात आदिवासी समाजात काम करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य सखाराम डवरे, शिवसेना पक्षाचे डॉ. दीपक नाईक, काँग्रेस पक्षाचे माजी सरपंच भीमराव वाकोडे, माजी सरपंच बळीराम खोकले, माजी सरपंच रामचंद्र भिसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला.
नांदेड येथील केंद्रीय पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमाला मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, डॉ. अंकुश देवसरकर तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर आदीसह हदगाव पूर्व मंडळातील नेते चांगूनराव बोईनवाड, शिवराज वारकड ओम इंदेवार, देवानंद वानखेडे, गजानन चव्हाण, महेश मठपती, स्वप्नील रामगिरवार, अवधूत कदम, संजय सोमेवाड, अरविंद हुंडेकर, अँड. नंदकुमार वारकड, मंगेश देशमुख, विठ्ठल मस्के, शशिकांत बंडावार, गजानन पदमवार, सचिन तांदळे, राहुल शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षप्रवेशामुळे तामसा व आष्टी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीला बळ मिळणार आहे. पक्ष संघटन मजबूत होऊन आदिवासी तरुण, जेष्ठ मंडळी सहभागी झाल्यामुळे निवडणुकीत निश्चित फायदा होईल
- भागवत देवसरकर