Nanded MLC election : विधान परिषद निवडणूक; आठही उमेदवारांचे अर्ज वैध

उद्या अर्ज मागे घेण्याची मुदत; नाट्यमय घडामोडी घडणार!
Nanded MLC election
विधान परिषद निवडणूक; आठही उमेदवारांचे अर्ज वैधpudhari photo
Published on
Updated on

नांदेड ः नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी दाखल झालेले 8 उमेदवारांचे एकूण 17 अर्ज मंगळवारी झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 जून असल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

नांदेडच्या राजकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असे संकेत असले तरी 4 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडतील, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

Nanded MLC election
Krishna sugar factory: कृष्णा कारखाना निवडणुकीचे रणशिंग फुंकले

सोमवार, 1 जूनपर्यंत महायुतीच्यावतीने भाजपचे अमरनाथ राजूरकर, काँग्रेसचे रामदास पाटील, यांच्यासह ज्योतिबा खराटे, प्रवीण पाील चिखलीकर, कृष्णा नागेश पाटील (अपक्ष), प्रवीण पाटील चिखलीकर, माधवराव निवृत्तीराव पवार, पंकज गायकवाड, प्रशांत इंगोले या आठ उमेदवारांनी एकूण 17 अर्ज दाखल केले होते. यापैकी अमरनाथ राजूरकर आणि रामदास पाटील या दोघांनीही नामनिर्देशनपत्रांसोबत आपापल्या पक्षाचा एबी फॉर्म दाखल केला आहे.

Nanded MLC election
Konkan Politics : कोकण मतदार संघातून ६ जणांचे अर्ज दाखल

मंगळवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात सर्व 17 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news