Krishna sugar factory: कृष्णा कारखाना निवडणुकीचे रणशिंग फुंकले

उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल
Krishna sugar factory: कृष्णा कारखाना निवडणुकीचे रणशिंग फुंकले
Pudhari News Network
Published on
Updated on

कराड : कराड तालुक्यासह वाळवा, खानापूर आणि कडेगाव तालुका कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष लागून असलेल्या शिवनगर (ता. कराड) यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे जाहीर झाली आहे. 2026-27 ते 2031-32 या कालावधीसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली असून निवडणुकीसाठी तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था कराड तथा निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांची नियुक्ती केली आहे.

जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 18 ते 22 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 26 मे निश्चित केली आहे. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असून 21 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानानंतर 23 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर हेोणार असल्याचे अपर्णा यादव यांनी सांगितले.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड, वाळवा, खानापूर आणि कडेगाव परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध गटांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल : 18 मे ते 22 मे

अर्ज माघारी : 26 मे ते 9 जून

मतदान : 21 जून

मतमोजणी व निकाल : 23 जून

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news