Nanded Crime | सिंदखेड पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात धडक कारवाई; ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

सिंदखेड पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई
Sindkhed Police Illegal Gutka Bust
सिंदखेड पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईPudhari
Published on
Updated on

Sindkhed Police Illegal Gutka Bust

सारखणी : नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. याच मोहिमेंतर्गत सिंदखेड पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत तब्बल ७ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांच्या आदेशानुसार सिंदखेड पोलिस ठाण्याचे पथक दि. २० ऑगस्ट रोजी अवैध धंद्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गस्त घालत होते. यावेळी माहूर–सारखणी मार्गावरील गोंडवडसा तानवशी नाका परिसरात पोलिसांना एक संशयास्पद वाहन आढळून आले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आला.

Sindkhed Police Illegal Gutka Bust
Nanded crime: अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार; आरोपीस उर्वरित आयुष्य आजन्म कारावासाची शिक्षा

जप्त केलेल्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची किंमत १ लाख ४० हजार ७०० रुपये, तर वाहनाची अंदाजे किंमत ६ लाख रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ७ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी प्रफुल्ल भालचंद्र येवणार (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, एखर्डा) आणि नितीन धर्माजी अल्लडवार (वय ४९, रा. सुभाष वॉर्ड, एखर्डा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Sindkhed Police Illegal Gutka Bust
Nanded Crime : नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर तरुणाचा खून; दाेन जण गजाआड

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष जोधुळे, पोलिस अंमलदार आकाश सावंत, कदम, वनखेडे आणि होमगार्ड यांनी केली.

दरम्यान, प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू किंवा अन्य प्रतिबंधित पदार्थांची साठवणूक, विक्री अथवा वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी ती तत्काळ पोलिस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news