Nanded News : सीमाभागातील जंगलात सागवान तस्करांचा धाडसी प्रयत्न उधळला

चिखली बीट परिसरात वनविभागाची धडक कारवाई : अंधाराचा फायदा घेत तस्कर फरार
Nanded News
Nanded News : सीमाभागातील जंगलात सागवान तस्करांचा धाडसी प्रयत्न उधळलाFile Photo
Published on
Updated on

A daring attempt by teak smugglers in the border region's forest was thwarted

किनवट, पुढारी वृत्तसेवा तेलंगणा महाराष्ट्र सीमाभागातील दाट जंगलात सागवान तस्करीचा मोठा कट वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला. पायी गस्तीदरम्यान वनकर्मचाऱ्यांच्या नजरेस सागवान लाकूड डोक्यावरून वाहून नेत अस लेले तब्बल वीस ते तेवीस तस्कर पडले. अचानक झालेल्या कारवाईमुळे तस्करांनी अवैध लाकूड व कटसाईज नग घटनास्थळी टाकून जंगलात पळ काढला.

Nanded News
Nanded District Bank Recruitment : जिल्हा बँकेतील नवे उमेदवार ठरले, दीड दिवसाचे गणपती !

ही घटना ७ जानेवारी २०२६ रोजी तेलंगणा महाराष्ट्र राज्य सीमेलगत कक्ष क्रमांक २००, सर्वे नंबर ५० अंतर्गत असलेल्या जंगलात घडली. महाराष्ट्र हद्दीतील नियतक्षेत्र चिखली बीट परिसरात वनविभागाचे पथक नियमित पायी गस्त घालत असताना ही संशयास्पद हालचाल आढळून आली. तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अंधार व जंगलाचा फायदा घेत पळ काढला. मात्र त्यांच्या मागे अवैध सागवान लाकडाचा साठा मिळून आला.

घटनास्थळी सागी कटसाईज नग २० (घनमीटर ०.५२२६) तसेच सागी गोल नग ३ (घनमीटर ०.२२८) असा एकूण १५ हजार ८३६ रुपयांचा अवैध माल वनविभागाने जप्त केला. या प्रकरणी प्रथम गुन्हा नोंद क्रमांक ०१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

Nanded News
Nanded News : लोहा पं.स. कर्मचाऱ्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

ही कारवाई उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहायक वनसंरक्षक किरण चव्हाण तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एल. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चिखलीचे वनपरिमंडळ अधिकारी बी. टी. जाधव, एच. बी. चौधरी, वनरक्षक व्ही. एस. मुळे, टी. आर. घोडके, इच्चोडा (तेलंगणा) येथील वनरक्षक ईश्वर पवार, वनमजूर तुळशीराम सिडाम, एल. पी. शिंदे, राजू रबडे, जंगा सिडाम आणि वाहनचालक बाळकृष्ण आवले यांनी या धाडसी कारवाईत सहभाग घेतला.

सीमाभागातील जंगलांमध्ये वाढत चाललेल्या सागवान तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाने गस्त व निगराणी अधिक तीव्र केली असून, तस्करांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत वन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news