Nanded News : लोहा पं.स. कर्मचाऱ्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

नाहक त्रास देणाऱ्या 'त्या' युवकाचा बंदोबस्त करण्याची मागणी
Nanded News
Nanded News : लोहा पं.स. कर्मचाऱ्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्याFile Photo
Published on
Updated on

Loha Panchayat Samiti employees stage a sit-in protest at the police station

लोहा पुढारी वृत्तसेवा : लोहा पंचायत समिती कार्यालयात नेहमीच ग्रामीण भागातील कामकाजानिमित्त लोकांची वर्दळ असते पण यामध्ये बालाजी अर्जुन शिंदे हा तरुण नेहमीच कर्मचारी अधिकाऱ्यांशी वाद घालून दमदाटी करत असल्याचा प्रकार समोर आला त्या तरुणास नेहमीच समजावून सांगण्यात आले, पण कोणताही उपयोग झाला नाही.

Nanded News
Nanded Municipal Election : भाजपाची प्रसिद्धी छता-छतांवर; काँग्रेस केवळ ‌‘कानावर!‌’

हा युवक नेहमीच कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, व्हिडिओ काढणे असे प्रकार करत असल्यामुळे वैतागलेल्या कर्मचारी, ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशन गाठून सामूहिक अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या तरुणाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील रिसनगाव येथील आरोपी बालाजी अर्जुन शिंदे हा बुधवारी (दि.७ जानेवारी) सकाळी साडेदहा वाजता पंचायत समिती कार्यालयात येऊन घरकुल विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत होता. हा प्रकार नेहमीचाच झाल्याने कर्मचारी देखील या तरुणाला वैतागले होते. त्या तरुणाविरुद्ध बुधवारी (दि.७) शंभर ते दीडशे अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोहा पोलिस स्टेशन गाठून त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस निरीक्षक आयलाने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Nanded News
Nanded District Bank Recruitment : जिल्हा बँकेतील नवे उमेदवार ठरले, दीड दिवसाचे गणपती !

सदरील तरुण हा दररोज पंचायत समिती लोहा येथे विविध विभागांत कर्मचारी अधिकाऱ्यांशी वाद घालत असल्याचा प्रकार समोर आले आहे. ग्रामीण भागातील लोकांची कामे करून देतो म्हणून पैसे उकळून तो या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी वाद घालत असल्याची नेहमीच चर्चा ऐकावयास मिळत होती.

गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनमध्ये ग्रामसेवक संघटना व कर्मचारी यांच्या वतीने एक सामूहिक निवेदन देऊन त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे लोहा पोलिस ठाणे येथे त्या तरुणाविरुद्ध कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे सर्व कर्मचारी पोलिस स्टेशन येथे दिवसभर ठाण मांडून गुन्हा दाखल करण्याची प्रतीक्षा करीत होते.गुन्हा दाखल झाल्यानंतरच कर्मचारी परतले.

गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, सहायक गटविकास अधिकारी संगीता वानखेडे, प्रशासकीय अधिकारी घोडके, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गजानन शिंदे, सचिव शैलेश बिस्मिल्ले, बांधकाम विभागातील उप अभियंता शिवाजी राठोड, ग्रामसेवक मंगेश कासले, रमेश राठोड, वालाजी मुंडे यांच्यासह शंभर ते दीडशे ग्रामसेवक व अधिकारी कर्मचारी दिवसभर ठाण मांडून बसले होते. त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतरच अधिकारी, कर्मचारी ठाण्यातून परतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news