नांदेड : डोळ्‍यात मिरचीपूड टाकून बचतगट कर्मचा-यास लुटले; अडीच लाख रूपये लंपास

file photo
file photo
Published on
Updated on

वाई बाजार, पुढारी वृत्तसेवा बचतगटाची वसूली करून परतणा-या बचतगट कर्मचा-याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण करत तब्बल अडीच लाख रूपये लुटल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सायफळ नजीक घडली असून, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या विषयी अधिक माहितीनुसार, माहूर तालुक्यातील मौजे सायफळ येथे बचतगटाचे कर्मचारी प्रविण कौरे हे आज दि.३ मार्च रोजी त्यांच्या नियोजित बचतगट मिटींग तथा वसूलीसाठी त्यांची दुचाकी क्र. एम.एच. २७ सी.एस. ७३८१ या वरून मिटींगसाठी गेले होते. दरम्यान सकाळी ११ वाजता मिटींग संपवून बचतगटाच्या वसूलीपोटी जमवलेले दोन ते अडीच लाख रूपये घेवून ते वाई बाजारकडे निघाले होते. सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सायफळ ते गोकुळ रोडवर शेतातून जाणा-या जोडरस्त्यावर लुटमारीच्या उद्देशाने चारजण दबा धरून बसले होते. दरम्यान सदर बचतगट अधिकारी समोरून येत असल्याचे पाहून अगदी रोडवर येवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली व कौरे यांच्या जवळ असलेली बॅग हिसकावण्यासाठी त्यांना लाकडी काठ्यांनी त्‍यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कौरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ते भांबावून गेल्याने चोरटे त्यांची पैशांची बॅग हिसकावून पसार झाले. तर काही क्षणांत रस्त्याने येणा-या काहींनी जखमी कर्मचा-यांस वाई बाजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारालाठी माहूरच्या ग्रामीण रूग्णालयाकडे रवाना केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांच्यासह पो.हे.कॉ पठाण यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी घटनास्थळावर रक्ताचे डाग असलेल्या तीन लाकडी काठ्या पोलीसांनी ताब्यात घेतल्या असून, त्याच ठिकाणी डांबरी रोडवर मिरचीची पूड देखील पडल्याचे दिसून आले. तर या प्रकरणी सिंदखेड पोलीसांत अद्याप घटनेची तक्रार न आल्याने अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही.

"विशेष म्हणजे सबंधित बचतगट कर्मचा-याची मिटींग संपल्यानंतर तो कोणत्या मार्गाने व कोणत्या गाडीवरून तसेच किती वेळात येणार याची खात्रीशीर माहिती सदर लुटारूंना नेमकी कशी मिळाली. याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात असून घटनास्थळ तसेच परिसराची संपुर्ण माहिती असणा-यांचेच हे कारस्थान असावे असा कयास बांधला जात आहे. या प्रकरणात स्थानिक का इतर काही संबंध..? याबाबतच्या दोन्ही बाजूने तपास करण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे. त्यामुळे प्रकणाच्या मुळाशी कोण आहे हे पोलीस तपासातूनच कळणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news