नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील उमरी, अर्धापूर, भोकर, तामसा आणि हिमायतनगर येथील शहरांसह तालुक्यात आज (दि.११) सांयकाळी ५.१५ च्या सुमारास वादळीवा-यासह गारपीट झाली. सलग आर्धातास झालेल्या गारपिटीच्या पावसामुळे शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात हवामान खात्याने ९, १० आणि ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. उमरी तालुक्यातील बिनताळ, जिरोना, ईश्वरनगर, दुर्गानगर, गोरठा, तळेगाव तसेच अर्धापूर, भोकर, तामसा आणि हिमायतनगर येथे आज सायंकाळी वादळी- वा-यासह अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामुळे गहू, ज्वारी, हरभ-यासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाला मोहर आला होता. मात्र या गारपिटीने तो गळून पडल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा :