Ramdas Athawale : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांवर जनतेने निवडणुकीत बहिष्कार टाकावा : रामदास आठवले | पुढारी

Ramdas Athawale : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांवर जनतेने निवडणुकीत बहिष्कार टाकावा : रामदास आठवले

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : राममंदिराच्या सोहळ्याचे काँग्रेससह विरोधी पक्षाने राजकारण करून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्याचे काम केले आहे. या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणा-यांवर जनतेने आगामी निवडणुकीत बहिष्कार टाकावा, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. Ramdas Athawale

मंत्री आठवले नांदेड दौ-यावर आले होते. माहूर तालुक्यातील आष्टा येथील भीमराव पुनवटकर या पॅथर चळवळीतील लढवय्या कार्यकर्त्याचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते आले होते. त्यांनी पुनवटकर कुटुंबियांना रिपाइंच्या वतीने एक लाख रुपयांची मदत केली. तसेच त्यांच्या पत्नीस माहूर आश्रम शाळेवर नोकरी देण्यात येणार आहे. Ramdas Athawale

आष्टा येथील भेट आटोपून आठवले यांचे नांदेड येथे आगमन झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, रिपाइंच्या कार्यकर्त्यांना सक्रीय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गावातील सर्व जातीजमातीतील कार्यकर्त्यांना एकत्र करून रिपाइंची पक्षबांधणी केली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मला मिळाले आहे. मी तिथे जाणार आहे. सर्व समाजाच्या धर्मगुरूंना सर्वधर्मसमभाव मानत आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांनी राम मंदिराचे राजकारण करू नये. सोनिया गांधी, मलिकार्जुन खर्गे यांनीही या सोहळ्यास यावे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप एनडीए आघाडीला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील. इंडिया आघाडीला या निवडणुकीत यश मिळविणे तेवढे सोपे नाही. संविधान बदलले जात आहे, असा प्रचार विरोधकांकडून केला जात असून संविधान बदलणे सोपे नाही, तथापि कोणाचाही बापही संविधान बदलू शकणार नाही, असे आठवले म्हणाले.

भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी काढत आहेत. पण त्याने फारसा फरक पडणार नाही, रिपाइंला लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळावेत, शिर्डी किंवा सोलापूरमधून निवडणूक लढण्याची माझी तयारी आहे. ही निवडणूक मी कमळ निशाणीवर न लढता मला मिळणा-या निशाणीवरच लढणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Ramdas Athawale : जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा

ओबीसींतून आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे करत आहेत, त्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. परंतु तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने ओबीसींना दोन प्रकारे आरक्षण दिले आहे. त्याचपद्धतीने ओबीसींत वेगळा प्रवर्ग करावा. व त्याचा अभ्यास करून आरक्षण देण्याचा विचार सरकारने करावा, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

रोहि पिंपळगावची घटना मानवतेला कलंक

रोहि पिंपळगाव येथील चिमुकलीचा झालेला खून मानवतेला कलंकित करणारी घटना आहे. अशी मानसिकता उखडून टाकण्याची गरज आहे, या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आपली मागणी आहे, याबाबत पोलीस अधीक्षकांना सूचना करणार असल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button